लोकसत्ता टीम

गोंदिया: शरद पवार म्हणाले की अजित पवार हे आमचेच नेते आहेत. मग अजित पवारांनी भाजपासोबत येण्याची भूमिका स्वीकारली तरी अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते आहेत तर नेत्यांनी स्वीकारलेली भूमिका ही आपणास मान्य असायला पाहिजे असं मी म्हटलेलं आहे. माझ्या बोलण्याच्या वेगळा अर्थ काढण्यात आला. ज्याप्रमाणे अजित पवार यांचं मतपरिवर्तन झालं तसचं आज ना उद्या शरद पवार यांचं सुद्धा मतपरिवर्तन होऊ शकते, असे वक्तव्य भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी गोंदियात केले.

What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Action will be taken against employees who refuse election work
निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जोरगेवारांनी थेट फडणवीसांसमोरच व्यक्त केली मुनगंटीवारांवरील नाराजी; म्हणाले, “उमेदवारी मिळू नये म्हणून…”

भाजपच्या जनसंवाद यात्रेदरम्यान ते माध्यमांशी बोलत होते. येत्या २०२४ पर्यंत भाजपमध्ये काँग्रेस, उर्वरित राष्ट्रवादी काँग्रेस आदि पक्षांसह इतरांच्याही प्रवेशाचे बॉम्ब फुटेल, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला. येणाऱ्या दिवसात महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता दिसेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वात भाजप निवडणूक जिंकेल. शरद पवार भाजपामध्ये येतील असं मी कधीच म्हटलं नाही. शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी असं काहीही बोलणार नाही. शरद पवार यांनी मला मूर्ख म्हटलं परंतु ते वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल मी काही वक्तव्य करणार नाही, अशी भूमिका बावनकुळे यांनी मांडली.

आणखी वाचा-“अजित पवार हे सत्तेसाठी नाही तर ईडीमुळे सरकारमध्ये सहभागी झाले,” विजय वडेट्टीवार यांची टीका, म्हणाले…

शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सगळे उद्योग हे गुजरातमध्ये नेण्याचा आरोप केला आहे, त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, ही निवडणुकीकरिता मांडलेली भूमिका आहे. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये श्वेतपत्रिका काढली. जेवढे उद्योग महाविकास आघाडीच्या काळात गुजरातमध्ये गेले आहेत, त्यावर बोलायला कोणीही तयार झालेला नाही. अजित पवार मुख्यमंत्री होतील असे कार्यकर्ते आणि नेत्यांचे म्हणणे आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, प्रत्येक पक्षाच्या नेत्याला असं वाटते की आपल्या पक्षाच्या नेता हा मुख्यमंत्री व्हावा परंतु आमच्या वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वीच सर्वांना सांगितलाय की शिवसेनेचे एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री राहतील. आम्हाला सुद्धा वाटते की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व्हावे राष्ट्रवादीला सुद्धा वाटते की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, त्याचप्रमाणे काँग्रेसला सुद्धा वाटते की नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अशोक चौहान, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री, अशी खूप मोठी लिस्ट आहे. पण आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहे, असे बावनकुडे यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा-सना खान हत्याकांड दडपण्याचा प्रयत्न? भाजप नेत्यांची नावे समोर आल्याने पोलीस पेचात

काँग्रेसमध्ये कोण जास्त बोलते याची स्पर्धा लागली आहे…

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जास्तच बोलतात, अशी टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, मी एक छोटा कार्यकर्ता आहे आणि वडेट्टीवार हे आता नवीन नवीन विरोधी पक्ष नेते झालेले मोठे नेते आहेत त्यामुळे नाना पटोले जास्त बोलतात की विजय वडे्टीवार जास्त बोलतात, यांची आपसामध्ये स्पर्धा सुरू आहे. मी सामान्य माणूस असल्यामुळे मी सामान्य लोकांसोबत राहून जनसंपर्क करीत आहे. गोंदिया भंडारा लोकसभा निवडणुकीत ही जागा भाजपलाच मिळेल, असा विश्वासही बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.