नागपूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार २७ व २८ डिसेंबरला या दोन दिवसासाठी अमरावती जिल्हाच्या दौऱ्यावर येणार आहे. या दरम्यान त्यांनी परतवाडा तालुक्यातील वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमास भेट द्यावी, अशी विनंती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. त्यांची ही विनंती पवार यांनी मान्य केली असून ते २८ डिसेंबरला आश्रमाला भेट देणार आहे.पवार २७ डिसेंबरला विशेष विमानाने सकाळी ११ वाजता अमरावती येथे येतील. यानंतर ते विश्राम गृहात कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेवून शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजीत कार्यक्रमास दुपारी ४.३० वाजता उपस्थीत राहतील.
यानंतर त्यांचा अमवराती येथेच मुक्काम असेल. २८ डिसेंबरला सकाळी १०.४५ वाजता वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमास भेट देवून तेथील संपूर्ण कार्य व माहिती जावुन घेतील. नंतर दुपारी १२.०० वाजता उपतखेडा येथे आदिवासी संमेलनास उपस्थीत राहणार आहे. यानंतर अमवराती येथे सायंकाळी पाच वाजता परत येवून विशेष विमानाने मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.गाडगे बाबांचे पाईक आणि अनाथांचे नाथ म्हणून ख्यातकीर्त असलेले शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमास शरद पवार यांनी भेट द्यावी, अशी अनेक दिवसांपासून अनिल देशमुख यांची ईच्छा होती. परंतु योग जुळून येत नव्हता. दरम्यान विविध कार्यक्रमासाठी शरद पवार हे अमरावती जिल्हाच्या दौऱ्यावर येत असल्याने योग जुळून आला