उमेदवारी मागे घेण्याचा प्रश्नच नाही, ती कार्यकत्यांशी प्रतारणा ठरेल, मी लढणार आणि जिंकणारही, असा विश्वास काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांनी व्यक्त केला. थरूर यांचे आज सकाळी वर्ध्यातील सेवाग्राम येथे आगमन झाले. राजेंद्र शर्मा यांच्या संस्थेत आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा- अकोला : घराच्या अंगणात लावली गांजाची झाडे; अकोला जिल्ह्यातील पातूर येथील धक्कादायक प्रकार
सेवाग्राम येथे शशी थरुर यांची चांगलीच ‘क्रेझ’ दिसून आली. उपस्थित सर्वांनीच त्यांच्याकडे धाव घेतली. अनेकांनी त्यांच्या समवेत फोटो काढून घेण्याची हौस भागवून घेतली. यावेळी आशीष देशमुख व ईकराम हुसेनही उपस्थित होते.
हेही वाचा- चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ‘सफारी’ला सुरुवात; पहिल्याच दिवशी पर्यटकांची गर्दी
काँग्रेस लोकशाही मानणारा पक्ष आहे. त्यामुळे निवडणूक होणारच. माझ्यावर अर्ज मागे घेण्यासाठी कोणताही दबाव नाही. उमेदवारी मागे घेण्याचा प्रश्नच नाही. मी लढणार व विजयी पण होणार, असे थरूर म्हणाले. दरम्यान, दोन्ही उमेदवार दक्षिणेतीलच आहे, उत्तरेत काँग्रेस संपली का, या प्रश्नावर थरूर म्हणाले, आम्ही पूर्ण भारताचेच प्रतिनिधित्व करतो. काँग्रेसला उत्तर भारतात पुन्हा सक्षम करण्याची जबाबदारी घेणार. गांधी कुटुंबाचा खर्गे यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा असल्याची होत असलेली चर्चा व्यर्थ आहे. मी मनापासून ही निवडणूक लढत आहे, असे त्यांनी परत निक्षून सांगितले.