बुटीबोरी येथे वर्धा पोलिसांनी क्रिकेट सट्टा अर्थात बेटिंग खेळणाऱ्या सहा आरोपींना अटक केली होती.त्यापूर्वी वर्धा व हिंगणघाट येथे हा प्रकार उघडकीस आला होता.वर्धा व लगतच्या जिल्ह्यात खेळल्या जाणाऱ्या बेटिंगची पाळेमुळे खणून काढण्याची तयारीच पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी केली.

वर्धेत अटकेत असलेल्या एका आरोपीची कसून चौकशी केल्यावर अकोला येथील शशिकांत कृष्णा सावंत हा बेटिंगचे साहित्य पुरवत असल्याची माहिती हाती आली. वर्धा पोलीसांनी अकोला गाठत सावंतला जेरबंद केले. तो अकोला मुक्कामी राहून महाराष्ट्रातील बुकींना लागणारे साहित्य तसेच स्वतः तयार केलेले साहित्य पुरवित असल्याचे समोर आले आहे. खेळल्या जाणाऱ्या प्रत्येक चेंडूवर सट्टा लावणारी व्यवस्था त्याने तयार केली होती.

हेही वाचा >>>नागपूर: धवनकरांनी प्राध्यापकांना पैसे मागितल्याची ध्वनिफीत ‘लोकसत्ता’च्या हाती

या प्रकरणात अटक झालेल्या काहींना जामीन मिळाला असून सावंत,जितेंद्र तिवारी,मुकेश मिश्रा व सलमान मेमन कोठडीत आहे.बुटीबोरी येथे टाकलेल्या धाडीत चाळीस मोबाईल,दोन महागड्या कार,लॅपटॉप व मुद्देमाल जप्त करण्यात आल्यानंतर पोलीसांना बेटिंगचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरल्याचे लक्षात आले होते.

Story img Loader