बुलढाणा : श्री संत गजानन महाराजांच्या ११४ व्या पुण्यतिथी उत्सवास थाटात प्रारंभ झाला. यानिमित्त ८ सप्टेंबरपर्यंत श्रींच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रींच्या मंदिरात पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी ६ ते ६.४५ काकडा, सकाळी ७.१५ ते ९.१५ भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.३० ते ६ हरिपाठ रात्री ८ ते १० कीर्तन, ६ सप्टेंबर ह.भ.प. प्रशांत बुवा ताकोते (शिरसोली), ७ सप्टेंबर ह.भ.प. भरत बुवा पाटील (म्हैसवाडी), आणि ८ सप्टेंबर ह.भ.प. बाळू बुवा गिरगावकर (गिरगाव) आणि ह.भ.प. भरत बुवा पाटील म्हैसवाडीकर यांचे सकाळी ७ ते ९ वाजतापर्यंत समाधी सोहळ्यानिमित्त कीर्तन होणार आहे.

हेही वाचा >>> वर्धा : वैद्यकीय महाविद्यालयाची जागा दोन दिवसात ठरणार?

Diwali festival, celebration, relationship, family
दिवाळी: अर्थात नात्यांचा उत्सव
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
raju shetti, sugarcane farmers, jaysingpur,
उसाला ३७०० रुपये उचल द्यावी; ‘स्वाभिमानी’च्या परिषदेत मागणी
Buddhist Dalit communitys displeasure is a challenge to Congress in Bhandara Constituency
बौद्ध दलित समाजाच्या नाराजीचे भंडारा मतदारसंघात काँग्रेससमोर आव्हान!
Sharad pawar demand supreme court to freeze clock,
‘घड्याळ’ चिन्हाबाबत उद्या सुनावणी; शरद पवार गटाची बाजू ऐकण्याची तयारी
mla kishor jorgewar
‘चंद्रपूर’मध्ये नाराजीचा सूर, काँग्रेस इच्छुकांचा स्वप्नभंग?
bjp kolhapur
मनोमिलनानंतर इचलकरंजीतील भाजपातील नाराजीनाट्य रंगतदार वळणावर
Hitendra Thakur, Hitendra Thakur party,
हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचे ‘शिट्टी’ चिन्ह धोक्यात

उत्सवाच्या प्रारंभिक टप्प्यात गणेशयाग व वरूणयागास ४ सप्टेंबरला आरंभ झाला आहे. दि. ८ सष्टेबर रोजी सकाळी १० वा. यागाची पुर्णाहूती व अवभृतस्नान श्रीचे ब्रम्हवृंद यांच्या उपस्थितीत होईल. दुपारी उत्सवाची पालखीचे श्रींच्या रजत मुखवट्याचे पुजन होवून श्रींच्या पालखीचे रथ, मेणा, पताका टाळकरी, अश्‍वासह परिक्रमा निघेल. सायंकाळी मंदिरात श्रींची महाआरती व टाळकरी यांचा आकर्षक रिंगण सोहळा व श्रींची आरती होणार आहे. दि.९ सष्टेबर रोजी हभप श्रीधरबुवा आवारे मु.खापरवाडी यांचे सकाळी ६ ते ७ काल्याचे कीर्तन होईल व नंतर दहीहंडी गोपाळकाला कार्यक्रम होणार आहे.

लख्ख प्रकाशाने उजळले मंदिर

यानिमित्त संत गजानन महाराज संस्थानच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसरात सर्वत्र केळीचे खांब व आंब्याच्या पानांचे तोरण लावण्यात आले आहे. यामुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. श्रींच्या नामघोषात भक्त तल्लीन झाले असून महाराष्ट्रातील मराठवाडा, खानदेश, विदर्भासह मध्य प्रदेशातील भजनी दिंड्या ‘ज्ञानोबा तुकाराम’चा नामघोष करीत संत नगरीत श्रींच्या पुण्यतिथी उत्सवात सहभागी होत आहेत.

हेही वाचा >>> अजित पवारांच्या दौऱ्यानंतर नागपुरात पक्षात पडझड, प्रदेश सरचिटणीसाचा राजीनामा

भाविकांसाठी सुविधा

भक्तांच्या सोयीसाठी श्रींचे दर्शनसाठी एकेरी मार्ग आखण्यात  आला आहे. त्यात दर्शनबारी, श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, पारायण मंडप, श्रींची गादी व पलंग तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भक्तांच्या सोयीसाठी संस्थानच्या भक्त निवासामध्ये नियमानुसार अल्पदरात राहण्याची व्यवस्था नित्याप्रमाणे सुरू आहे. संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता ही भक्तांना श्रींच्याप्रति आपली आस्था प्रसन्न मनाने एकरूप करणारी आहे. भक्तांना कोणताही त्रास होवू नये यास्तव श्रींचे सेवेकरी आपली सेवा देण्यास तत्पर आहेत. या उत्सव काळात सर्वतोपरी सोयीसुविधा संस्थानच्या वतीने पुरविल्या जात आहेत.

उत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन

श्री गजानन सेवा समितीद्वारा श्रींच्या ऋषिपंचमी उत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन अग्रसेन भवन येथे ७ आणि ८ सष्टेबर रोजी करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजेपासून रात्रीपर्यंत अविरत महाप्रसाद वाटप सुरू राहणार आहे. शेगाव, नागपूर, अकोटचा भक्त परिवार, श्री गजानन सेवा समिती दरवर्षी ऋषिपंचमी, रामनवमी, प्रगटदिन या उत्सव काळात श्रींच्या भक्तांना महाप्रसादाचे वितरण करून आपली सेवा अर्पित करीत असतात.