बिबट्याच्या तावडीतून बकरीला सोडवण्यासाठी गुराखी थेट बिबट्याशी भिडला. या झटापटीत गुराखी गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. आरमोरी तालुक्यातील देऊळगाव परिसरातील ही घटना असून खुशाल उरकुडा कोहळे (५८ रा.देऊळगाव) असे त्या गुरख्याचे नाव आहे.  खुशाल उरकुडा हे मजुरीची कामे करतात. रिकाम्या वेळात ते गुरेही चारतात. शनिवारी दुपारच्या सुमारास ते देऊळगाव येथील टेकडीवर बकऱ्या चारण्यासाठी गेले होते.

हेही वाचा >>> महाराष्ट्राच्या राज्यगीताचा चंद्रपूर नगरीतून शुभारंभ; ‘जय जय महाराष्ट्र माझा’ चा जागर

Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Man Saves Dog From Bear With Life-Risking
अस्वलाचा कुत्र्यावर हल्ला, जबड्यात पकडली त्याची मान; जीव वाचवण्यासाठी धाडसी माणुस थेट अस्लवाशी भिडला, पहा थरारक Video
lonar lake flamingos marathi news
Video : ‘फ्लेमिंगो’ला आवडले लोणार सरोवर
tiger attacked farmer who went to pluck cotton in his field at Virur station in Rajura taluka
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; गावकऱ्यांमध्ये दहशत
Injured Python yelikeli Akola , Python Akola district ,
VIDEO : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात विशालकाय अजगर जखमी; दोन तास शस्त्रक्रिया अन्…
photo session with tiger
वाघासोबत फोटोसेशन ! लोकांनी पुन्हा वाघाला घेरले…

दरम्यान जवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने कळपातील एका बकरीवर हल्ला केला. हे बघून खुशाल क्षणाचाही विलंब न करता बकरीला वाचवण्यासाठी थेट बिबट्यावर धाऊन गेले. यावेळी झालेल्या झटापटीत त्यांना कपाळावर आणि मानेवर गंभीर दुखापत झाली. दरम्यान आवाज एकूण आसपासच्या नागरिकांनी कळपाच्या दिशेने धाव घेतल्याने बिबट्या जंगलात पळून गेला. माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व खुशाल यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

Story img Loader