नागपूर: मला उमेदवारी देऊ नये म्हणून बावनकुळे यांचाच दबाव होता, त्यांनी ज्यांना उमेदवारी दिली त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यानी घेतली होती, त्यामुळे रामटेकच्या शिवसेनेच्या पराभावासाठी तेच जबाबदार आहेत, असा थेट आरोप रामटेकचे शिंदेगटाचे मावळते खासदार कृपाल तुमाने यांनी दिल्लीत वृत्तवाहिन्यांशी बोलताना केला व भाजप नेते अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजू  पारवे यांचा दणदणीत पराभव झाला. त्यानंतर तुमाने यांनी थेट दिल्लीत  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्य केले.दिल्लीत वृत्तवाहिनीशी बोलताना तुमाने म्हणाले,  चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वेक्षणाचा आधार घेऊन मला उमेदवारी देऊ नका, असा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धरला होता. त्यासाठी अमित शहायांच्याकडून दबाव आणला होता.  रामटेकमध्ये कामठी हा माझा मतदारसंघ आहे, तेथून शिवसेनेचा उमेदवार विजयी करायचा असेल तर उमेदवार बदलवा, असे त्यांचे म्हणने होते. उमेदवार बदलला पण जो उमेदवार दिला त्याला सुद्धा ते निवडून आणू शकले नाही, त्यामुळे रामटेकच्या पराभवाची जबाबदारी त्यांनीच आहे.तेच खरे व्हिलन आहेत, असा आरोप तुमाने यांनी वृत्तावाहिनीशी बोलताना केला.

अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”

हेही वाचा >>> गडचिरोली : नक्षल्यांचा आणखी एक तळ उध्वस्त; मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त

तुमाने म्हणाले, मी दोनदा रामटेकचे प्रतिनिधित्व केले. दोन्ही वेळेला लाखाहून अधिक मतांनी निवडून आलो असतो. भाजपने कुठला सर्व्हे केला याची कल्पना नाही.त्यांनी त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्याला तिकीट दिले असते तर मला आनंद झाला असता. मात्र काँग्रेसच्या व्यक्तीला आणून तिकीट दिले,  ते मुख्यमंत्र्यांवर दररोज दबाव आणायचे. गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून दबाव आणून त्यांनी माझे तिकीट कापले, असा आरोप तुमताने यांनी केला.

हेही वाचा >>> पारस औष्णिक विद्युत केंद्रातील एक संच बंद; १५ दिवस संचातून वीजनिर्मिती ठप्प

गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार

मी अमित शहा यांना भेटून त्यांना तिकीट का कापली याची विचारणा करणार व बावनकुळे यांची तक्रार करणार असल्याचे तुमाने यांनी सांगितले. ज्यांच्या विधानसभा क्षेत्रात चांगली कामगिरी शकणार नाही त्यांच्यावर कारवाई करू असे बावनकुळे म्हणाले होते. आता त्यांच्यात विधानसभेत महायुतीचा उमेदवार मोठ्या पिछाडीवर होता. आता बावनकुळे स्वतःपासून कारवाई करणार का असा सवाल त्यांनी केला.

भाजपकडून तुमानेंचा निषेध

तुमाने यांनी केलेल्या आरोपांचा आम्ही निषेध करतो. तुमाने यांना रामटेकमधून दोनदा खासदार करण्यात भाजपने मौलिक भूमिका पार पाडली होती. त्यांना उमेदवारी देणे किंवा न देणे हा शिंदेसेनेचा प्रश्न होता. आम्ही तर ती जागा भाजपसाठी मागितली होती. मात्र ती जागा शिंदेसेनेकडे गेली होती. अरविंद गजभिये, सुधीर पारवे यांना शिंदेसेनेच्या तिकीटावर लढवावे असा प्रस्तावदेखील आम्ही दिला होता. राजू पारवे यांना शिंदेसेनेने उमेदवारी दिली होती. तुमाने यांनी विनाकारण टीका करू नये, असे भाजपचे डॉ. राजीव पोतदार म्हणाले. एखाद्या विधानसभेत महायुतीला मते मिळाली नाही तर काय सर्वांनीच राजीनामे देऊन घरी बसावे का असा सवाल पोतदार यांनी केला.

Story img Loader