कटकारस्थान रचून सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार असंवैधानिक आहे. हे सरकार राज्यपालांच्या कृपेने सत्तेवर असून येत्या १४ तारखेला न्यायालात कलम १० नुसार निर्णय झाल्यास सरकार कोसळेल, असे भाकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वर्तवले. एका कार्यक्रमानिमित्त वाशीममध्ये आले असता पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात बेरोजगारीची भीषण समस्या आहे.

हेही वाचा >>> अकोला : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भविष्यवाणी; म्हणाले, शिंदे गटाचे १६ आमदार १४ फेब्रुवारीला…

सामान्य कुटुंबातील गोरगरिबांची मुले डोळ्यात तेल घालून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात परंतु सामान्यांची मुले प्रशासकीय सेवेत जाऊ नये यासाठी सरकार वेळेवर अभ्यासक्रम बदलते. विद्यार्थ्यावर अन्याय होत असून अनेक युवक आत्महत्या करीत आहेत. केंद्रातील मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असून २०१९ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाला छेद देण्याचे पाप मोदी सरकारने केले. रेशीमबागेतील ९८ लोकांना कुठलीही परीक्षा न घेता थेट सहसचिव पदावर नियुक्त केले. सामान्य कुटुंबातील मुले प्रशासकीय सेवेत जाऊन जनतेचे प्रश्न सोडवतील, या भीतीपोटी मोदी सरकार मनुवादी व्यवस्था लादण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, काँग्रेस जनसामान्याच्या न्यायासाठी, संविधानासाठी लढत राहील, असे पटोले यांनी सांगितले.

Story img Loader