काँग्रेस खासदार राहुल गांधी महाराष्ट्रातून भारत जोडो यात्रा करीत होते, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन काँग्रेसचे अनेक नेते-कार्यकर्ते भाजपात प्रवेश करीत होते. राज्यात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जनतेचा विश्वास संपादन केला आहे. दोन्ही नेते संताजी-धनाजी प्रमाणे काम करीत आहेत, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>भंडारा : धक्कादायक ! अल्पवयीन मुलाचा ६ वर्षीय मुलीवर अत्याचार

भाजप, बाळासाहेबांची शिवसेना व मित्र पक्ष समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार नागोराव गाणार यांच्या प्रचारार्थ गडचिरोली येथील फंक्शन हॉलमध्ये आयोजित शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. विरोधकांकडे कोणताही उमेदवार नसल्याने त्यांच्यावर चार वेळा उमेदवार बदलण्याची वेळ आली. शब्द देऊनही त्यांनी पाळला नाही. त्यामुळे ‘एक दिल के तुकडे हुये हजार’ अशी स्थिती त्यांची झाली आहे, अशी खिल्ली उडवत बावनकुळे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

हेही वाचा >>>मराठी साहित्य संमेलन आयोजकांची आर्थिक कोंडी, शासनाकडून अद्याप अनुदान नाही; तयारीची गती मंदावली

‘किंचित आणि वंचित सेना एकत्र’
आता किंचित सेना व वंचित सेना एकत्र आली आहे. मात्र, यात कुठेही भीमसेना नाही. भीमसेना अशा लोकांसोबत येणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही काँग्रेसमध्ये जाणार नाही, असा शब्द दिला होता, मात्र तो शब्द त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी पाळला नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विकासकामे रखडली ते १८ महिने मंत्रालयातच आले नाही. शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकारने केले आहे. विना अनुदानित शाळेतील शिक्षकांना ११६० कोटींची मदत केली. आता पुन्हा शिक्षकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी त्यांना मताचे कर्ज द्यावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले.मेळाव्यात खासदार अशोक नेते, आ. देवराव होळी, आ. कृष्णाजी गजभे, गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, माजी मंत्री अमरीशराजे आत्राम आदी नेते उपस्थिती होते.

काँग्रेस जिल्हा सचिवांचा भाजपात प्रवेश
शिक्षक मेळाव्यात काँग्रेसचे जिल्हा सचिव संजय पंदिलवार यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्तासह भाजपात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने जिल्हा काँग्रेसला मोठे खिंडार पडले असल्याचे मानले जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde fadnavis likened to santaji dhanaji by bjp state president bawankule ssp 89 amy