नागपूर : महायुतीमधील तीनही पक्ष एकत्र आल्यावर जागा वाटपाबाबत सगळ्यांच्या मनासारखे होईल असे नाही. मात्र  तिन्ही पक्ष एकत्र  बसल्यावर जागा वाटप होईल आणि  एकत्र प्रचार करतील. राज्यात महायुतीला ४० पेक्षा अधिक जागा मिळतील, असे  कृषीमंत्री अब्दुल सत्तार नागपूर येथे म्हणजे. सत्तार म्हणाले, आम्हाला १३ पेक्षा जास्त जागा  मिळतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> बुलढाणा : पैशांचा वाद, मित्रच निघाले मारेकरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोज १८ तास काम करत आहे. त्यांच्यासोबत १३ खासदार ४० आमदार, दहा अपक्ष आमदार  आहेत. त्यामुळे आम्हाला १३ च्या वरच जागा मिळतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्याशी बोलले. त्यामुळे संभाजीनगरची जागा आमच्याकडे राहील.  एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाण शिवाय पर्याय नाही. ज्यांना कमळ चिन्हांची आठवण येत असतील त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना विचारून निर्णय घ्यावा आणि काय म्हणतील ते ऐकून घ्यावे, असेही सत्तार म्हणाले.

हेही वाचा >>> ‘मिस वर्ल्ड स्पर्धे’त झळकणार नागपूरकर डिझायनरचा पोशाख

शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये शाब्दिक वाद आहे. त्यात मी जास्त बोलणे योग्य नाही.  संजय राऊत हे स्वतः जेलमध्ये जाऊन आले. त्यामुळे ते दुसऱ्यासाठी तसेच स्वप्न पाहत आहे,  असेही ते म्हणाले. सामान्यातल्या सामान्य माणसाच्या गरजा लक्षात घेत दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही. याची दक्षता घेण्याचे काम देवेंद्र फडणवीस करीत असल्याचे सत्तार म्हणाले. आज हिंदुत्ववादी सरकारमध्ये  मी मंत्री आहे. समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. अजित पवार यांनीही वित्तमंत्री झाल्यापासून मदत केली. अमित शाह देशाचे नेते आहेत ते देशभर दौरे करत सभा घेत आहे. सभा फक्त संभाजीनगरमध्ये नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group minister abdul sattar talk about seat sharing in grand alliance parties vmb 67 zws