नागपूर : सत्ताधारी पक्षाने सोमवारी विरोधी पक्षाच्या आमदाराच्या आंदोलनाला प्रतिउत्तर देत ‘दाऊदशी संबंध ठेवणाऱ्या युवासेना पदाधिकाऱ्याचा धिक्कार असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत ‘ए.यू’ कोण? असा प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी केली. दुसरीकडे खासदार राहुल शेवाळे यांच्याकडून एका महिलेवर अत्याचार झाल्याचा आरोप करीत चौकशीचे आदेश देण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा: ‘गली गली में शोर है.. खोके सरकार चोर है’; विरोधकांच्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला

या प्रकरणी शेवाळे यांनी पत्रपरिषद घेत, तक्रारकर्त्यां महिलेचे दाऊद व युवा सेनेशी कनेक्शन असल्याचा आरोप केला. आज शिंदे गट व भाजप आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. दाऊदशी संबंधित महिलेला पाठीशी घालणाऱ्या युवासेनेच्या नेत्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भरतशेठ गोगावले, संजय बांगर, संजय शिरसाट, टेकचंद सावरकर, आशिष जयस्वाल, यांच्यासह बरेच आमदार उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group raised slogans outside legislative hall damn the yuvasena worker who is touch with dawood mnb 82 tmb 01