नागपूर : रामटेक लोकसभा मतदार संघ गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे,सध्या रामटेक शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिंदे गटाचा उमेदवार तेथून निवडणूक लढणार आणि अमरावतीची जागा भाजपकडे राहणार असल्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. याबाबत चर्चा असून लवकरच निर्णय होईल. ते नागपुरात बोलत होते. आज केंद्रीय समितीची बैठक आहे,ज्या ५ जागा भाजपकडे आहेत त्यावर आज चर्चा होईल असेही बावनकुळे म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावतीची जागा भाजपकडे आहे. शंभर टक्के ही जागा भाजपच्या चिन्हावर लढू आणि महायुतीचे सर्व नेते एकत्र येऊन ही जागा आम्ही जिंकणार आहे. उदयन राजे यांची सातारा ची मागणी आहे,त्यावर महायुतीचे नेते निर्णय घेतील. अमरावती मतदार संघात काही मतभेद होत असतात,बच्चू कडू किंवा अडसूळ यांचे मतभेद झाले असतील मात्र देशात मोदी प्रधानमंत्री व्हावे यासाठी बच्चू कडू,अडसूळ सगळे प्रयत्न करतील.

हेही वाचा…धुळवडीनंतरच प्रचारात रंग भरणार; अनेक मतदारसंघातील लढतीचे चित्र अस्पष्ट

बच्चू कडू आमच्या सोबत राहतील असेही बावनकुळे म्हणाले. संभाजीनगर बाबत तिढा नाही,चर्चा सुरू आहे.संजय राऊत सारख्या लोकांना जनता धडा शिकवेल, जे विरोधी पक्षातील नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका करत आहेत त्यांना जनता मतपेटीतून उत्तर देतील असेही बावनकुळे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde shiv sena will contest ramtek lok sabha seat bjp going to contest amravati chandrasekhar bawankule said in nagpur vmb 67 psg