लोकसत्ता टीम

यवतमाळ : जिल्ह्यात दररोज सरासरी एक खून होत असताना दिवाळीसारख्या सणामध्येही या घटना थांबलेल्या नाहीत. गुरूवारी सर्वत्र दिवाळीचा गजबजाट आणि वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीची धामधूम सुरू असतानाच शिवसैनिकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजता शहरालगतच्या वाघाडी जांब येथे घडली. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय
Thakurli Flyover Affected Residents, Thakurli Flyover,
ठाकुर्लीत उड्डाण पूल बाधित रहिवाशांचे विकासकाकडून पुनर्वसन
Young man died due to electric wire shocking video goes viral on social Media
विजेच्या तारेला स्पर्श झाला अन् २२ सेकंदाचा मृत्यूचा थरार सीसीटीव्हीत कैद; VIDEO पाहून सांगा नेमकं काय चुकलं?

योगेश नरहरी काटपेलवार (३६) रा. देवीनगर लोहारा असे मृताचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. योगेशचा खून जुन्या वादातून झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी तत्काळ तपास हाती घेत मारेकरी कोण याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. घटनास्थळाच्या शिवाय आजूबाजूला असलेल्या एका महिलेलाही चौकशीसाठी संशयितासह ताब्यात घेतले.

आणखी वाचा-चंद्रपूर : अल्ट्राटेक सिमेंट कंपनीविरूध्द सरपंच संघटनेचे आमरण उपोषण

या गुन्ह्यातील मुख्य मारेकरी चापडोह येथील असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. चापडोह येथे राहणाऱ्या महेश नामक युवकाने इतर साथीदारांना सोबत घेऊन हा गुन्हा केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी संजय पुज़लवार, ग्रामीण ठाणेदार प्रकाश तुणकलवार, सहायक निरीक्षक राहुल शेजव आदींनी भेट दिली.

Story img Loader