चंद्रपूर : कर्जमाफीची रक्कम शेतकरी लग्नसमारंभावर उधळतात,’’ अशा राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या या विधानानंतर विरोधात जिल्हा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले.मंत्री कोकाटे यांच्या विधाना विरोधात कोकाटे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी आणि राज्य सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत निषेध व्यक्त केला आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे याच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले. बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे, पण त्याचा अपमान करण्याची एकही संधी भाजप युती सरकार सोडत नाही. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना सत्तेचा एवढा माज चढला आहे, की ते सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत.अश्या मुजोर मंत्री कोकाटे यांच्यासारखी माणसे अशी विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांना कार्यमुक्त केले पाहिजे,’’ अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव, शालिक फाले, विधानसभा प्रमुख प्रमोद पाटील,तालुका प्रमुख आशिष कावटवार ,महिला जिल्हाप्रमुख सौ. कल्पना घोरघाटे ,तालुका प्रमुख विकास वीरूटकर ,बल्लारपूर तालुका प्रमुख प्रकाश पाठक , माजी तालुका प्रमुख संतोष नरूले ,युसूफ, महिला शहर प्रमुख ज्योती गहलोट , मनस्वी गिऱ्हे , उपशहर प्रमुख प्रमोद कोलारकर ,लोकेश कोटरंगे ,युवासेना चिटणीस सुमीत अग्रवाल , युवासेना शहर प्रमुख वैभव काळे ,वासिम खान भाई ,गणेश ठाकूर ,समीर कुरेशी ,राहुल भोयर, बाळू भगत ,हंसू खरोले , प्रशांत गडाला ,प्रशांत मांडरे , सोनु लिहीकर ,शारुखह शेख , चेतन ,जय हिकरे ,साजिद शेख , केतन बेले ,मयंक , तुषार , दीपांशु ,मंथन , मुकेश ,इत्यादी शिवसैनिक, महिला आघाडी ,युवासैनिक उपस्तिथ होते