लोकसत्ता टीम
नागपूर: राज्यात अलीकडच्या काळात विविध वास्तू, शहरांची नावे बदलण्याची मोहीमच सुरू झाली आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद आणि आता अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आता नागपूर यात मागे नाही. येथील शिवसेनेने महामेट्रोच्या शंकरनगर स्थानकाला स्वातंत्र्यवीर सावरकर याचे नाव देण्याची मागणी केली आहे शिवसेनेच्या जिल्हा संघटिका मनीषा पापडकर यांनी मेट्रो व्यवस्थापक यांना निवेदन दिले आहे.
नागपूर महानगरपालिकेने प्रत्येक नगर व चौकाच्या नावानुसार तेथील मेट्रो स्थानकाला नाव दिले आहे. मात्र शंकरनगर चौकात ४ दशकापासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा आहे त्यामुळे येथील चौकाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव द्यावे. सध्या स्थानकाला शंकरनगर चौक मेट्रो स्थानक असे नाव आहे.