नागपुरातील संघाच्या स्मृतीभवन परिसरात शंखनाद
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत २५ नोव्हेंबरला सभा घेत असताना आता विश्व हिंदू परिषदेने याच दिवशी अयोध्या, बेंगळूरू व नागपुरात एकाचवेळी हुंकार सभेचे आयोजन केले आहे. त्याचा शंखनाद आज शनिवारी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतीभवन परिसरात करण्यात आला.
राम मंदिरासाठी कायदा करा असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नुकताच केंद्राला दिला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा मुद्दा पुन्हा तापविण्याचा संघ परिवाराचा प्रयत्न सुरू आहे. याच क्रमात एक पाऊल पुढे टाकत संघाने नागपुरातील स्मृतीभवन परिसरापासून काही अंतरावरील हनुमानगरातील ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणात २५ नोव्हेंबरला हुंकार सभा आयोजित केली आहे.
या सभेला संघाचे पदाधिकारी, विश्व हिंदू परिषदेच्या साध्वी ऋतुंभरा देवी, शंकराचार्य, भाजपाचे नेते उपस्थित राहणार आहेत. सभा आयोजनासाठी आज शनिवारी सकाळी रेशीमबागेतील स्मृती भवन परिसरात झालेल्या संघ परिवाराच्या बैठकीला संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार, श्रीधर गाडगे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत संघटन मंत्री अरुण नेटके, अजय निलदावार, भाजपाचे सर्व आमदार, नगरसेवक असे जवळपास ७०० प्रतिनिधी उपस्थित होते.
मंदिरांमध्ये घंटानाद, सामूहिक महाआरती
या सभेला विदर्भातून लाखापेक्षा जास्त रामभक्त उपस्थित राहावे यासाठी जनजागरण सभा घेण्यात येणार आहे. पत्रके वाटणे, घरोघरी संपर्क करणे, मंदिरांमध्ये घंटानाद, सामूहिक महाआरती घेण्याची सूचना या बैठकीत करण्यात आली. याशिवाय १३ व १४ नोव्हेंबरला विधानसभा मतदार संघ निहाय सभांचे आयोजन करण्यात आले आहे.