Sanjay Gaikwad: बुलढाणा: शिवसेना शिंदे गटाचे आक्रमक आमदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लाडके नेते असलेले बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाला धारदार तलवारीने केक कापला. तलवारीनेच त्यांनी तो आपल्या अर्धांगिनी तथा अन्य सोयऱ्यांना भरविला. या वाढदिवस आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार तलवारीने केक भरवून तोंड गोड करीत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर (सोशल मीडियावर) सार्वत्रिक अर्थात ‘व्हायरल’ झाला असून यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बुलढाण्याचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मोठ्या मुलाचा (मृत्युंजय संजय गायकवाड) यांचा वाढदिवस पंधरा ऑगस्ट रोजी धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. एकीकडे भारतीय स्वातंत्र्य चा ७८ वा वर्धापन उत्साहात साजरा होत असतानाच मृत्युंजय गायकवाड यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा केंद्रबिंदू आणि जिल्हा मुख्यलाय असलेल्या बुलढाणा शहरातील अगदी कानाकोपऱ्यात वाढदिवस निमित्त मृत्युंजय गायकवाड यांचे जंगी पोस्टर, बोर्ड लावण्यात आले होते. हा वाढदिवस विविध कार्यक्रमाने मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. रात्री संपर्क कार्यालयाजवळ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हेही वाचा…शरद पवार नागपुरात, दणक्यात स्वागत; नेत्यांच्या भेटीगाठींकडे लक्ष

दरम्यान यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीने केक कापला. एवढेच नव्हे तर आमदारांनी आपल्या पत्नी तथा बुलढाणा नगर परिषदेच्या माजी अध्यक्षा सौभाग्यवती पूजा संजय गायकवाड याना तलवारीनेच केक भरविला. यानंतर उपस्थित इतर सोयऱ्यांना तलवारीने च केक भरवून त्यांचे तोंड गोड केले. त्या अगोदर मृत्युंजय गायकवाड यांचे जाहीर औक्षण करण्यात आला.. या ‘बर्थडे सेलिब्रेशन ‘ ची चित्रफीत (व्हिडिओ) सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा…यवतमाळ : लाडक्या बहिणीचा निधी भावाच्या बँक खात्यात जमा; अर्ज न करताही मिळाले पैसे

कारवाई होणार

दरम्यान तलवारीने केक कापल्यास अनेक व्यक्तींवर आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल होतो. अलीकडच्या काळात मोताळा, देऊळगाव राजा, मेहकर तालुक्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारावर बुलढाणा पोलीस विभाग काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघासह राज्यातील राजकीय वर्तुळाचे आणि जिख्यातील नेते, सामान्य जनता मतदार यांचे लक्ष लागले आहे.