बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा मतदारसंघातून विक्रमी विजय साकारला आहे. सुमारे २९ हजार ३७६ च्या फरकाने त्यांनी हा विजय मिळविला आहे. ते विजयी झाले असले तरी त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होण्यात अजून वेळ आहे.
हेही वाचा…रामटेकमध्ये दहा पैकी नऊ फेरीत शिवसेना (शिंदे) गटाची पिछाडी
विजयी उमेदवार जाधव यांना कमीअधिक ३ लाख ४८ हजार २३८ मते मिळाली. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी आघाडीचे नरेंद्र खेडेकर ३ लाख १८ हजार ८६२ मते घेत दुसऱ्या स्थानी राहिले आहे. अपक्ष रविकांत तुपकर यांना २ लाख ४८ हजार ९७७ मते मिळाली आहे. वंचित आघाडीचे वसंत मगर यांनी ९८ हजार ०५२ मते घेत आघाडीच्या पराभवात यंदाही वाटा उचलला आहे. दरम्यान मतमोजणी परिसरात पंधराव्या फेरीपासूनच युतीच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाल उधळून व फटाक्याच्या अतिषबाजीने जल्लोष करणे सुरू केले.