वाशीम : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, काँग्रेस जळत घर आहे. आणि आंबेडकरी चळवळ संपविण्याचं काम काँग्रेसनेच केले आहे. याउलट सरकार घटना धरूनच काम करीत आहे. असा आरोप शिवसेनेच्या नेत्या तथा उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी केला.

वाशीम येथे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना नेते अर्जुन खोतकर, खासदार हेमंत पाटील आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की भाजप घटना बदलणार असा खोटा आरोप विरोधक करतात.

हेही वाचा…वय वर्षे १०६, तरुणांना लाजवेल अशी इच्छाशक्ती; मतदान केंद्रांवर जाऊन केलं मतदान

मात्र, अनुसूचित जाती, जमाती यांचा विचार करणारे भाजप सरकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथे स्मारक, बाबासाहेब यांचे पुस्तकं आणि सर्वच बाबतीत चांगल काम होत असताना भावनिक लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र आता नागरिकांनी विचार केला पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

Story img Loader