अमरावती : राज्‍यपाल भग‍तसिंह कोश्‍यारी यांनी महापुरूषांबाबत केलेल्‍या वादग्रस्‍त वक्‍तव्‍यांचे पडसाद अजूनही उमटतच आहे. शिवसेनेच्‍या ठाकरे गटातील कार्यकर्त्‍यांनी शनिवारी प्रचंड घोषणाबाजी करीत राज्‍यपालांच्‍या वाहनाच्‍या ताफ्याला चपला दाखविण्‍याचा प्रयत्‍न केला. महाराष्‍ट्र आणि मध्‍यप्रदेशातील सीमावर्ती जिल्‍ह्यांच्‍या प्रश्‍नांवर शनिवारी येथील डॉ. पंजाबराव देशमुख प्रशासकीय प्रबोधिनी येथे राज्‍यपाल भगतसिंह कोश्‍यारी आणि मध्‍य प्रदेशचे राज्‍यपाल मंगूभाई पटेल यांच्‍या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्‍यात होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> नागपूर: व्याघ्रसफारीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांमुळे पर्यटकांचा जीव धोक्यात; परिवहन कार्यालयाच्या इशाऱ्यानंतरही वनखाते शांतच

या बैठकीला राज्‍यपाल भगतसिंह कोश्‍यारी हे विद्यापीठ मार्गे जात असताना द्रूतगती महामार्गावरील पुलाजवळ उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली.

शिवसैनिकांनी प्रबोधिनीमध्‍ये शिरण्‍याचा प्रयत्‍न केला, पण पोलिसांनी तो हाणून पाडला. शिवसैनिकांनी निषेध म्‍हणून ताफ्याला चपला दाखविण्‍याचा प्रयत्‍न केला. पोलिसांनी आंदोलन करणा-या शिवसैनिकांना लगेच ताब्‍यात घेतले. या आंदोलनाचे नेतृत्‍व शिवसेनेच्‍या ठाकरे गटाचे महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी केले. काही दिवसांपुर्वी राज्‍यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी महापुरूषांबाबत वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केले होते. त्‍याचा महाविकास आघाडीने निषेध केला होता. ठिकठिकाणी त्‍या विरोधात आंदोलने केली जात आहेत. राज्‍यपालांच्‍या अमरावती भेटीदरम्‍यान देखील शिवसैनिक आक्रमक झाल्‍याचे पहायला मिळले.