लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे) राजू पारवे हे पहिल्या दहा पैकी नऊ फेरीत पिछाडीवर होते. दहाव्या फेरी अखेर काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांना ३०३७९९ तर पारवे यांना २५५५९० मते मिळाली.
राजू पारवे यांनी ऐनवेळी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. तर माजी जिल्हा परिषद सदस्य रश्मी बर्वे यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने काँग्रेसने त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीला ही पार्श्वभूमी होती. बर्वे यांनी पहिल्या फेरीपासून पारवे यांच्यावर आघाडी घेतली. पहिल्या फेरीत पारवे यांना २४४०३ तर बर्वे यांना २८०६४ मते मिळाली. दुसऱ्या फेरीत पारवे यांना २५३७९ आणि बर्वे यांना ३०४२९ मते मिळाली तर तिसऱ्या फेरीत पारवे यांना २४९६० आणि बर्वे यांना ३१८८७ मते मिळाली. ही आघाडी नवव्या फेरीपर्यंत होती. दहाव्या फेरीत पारवे यांना ३०३५९ मते आणि बर्वे यांना २९१०९ मते मिळाली.
या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. भाजपाने या जागेवर दावा केला होता. परंतु एकनाथ शिंदे यांनी देखील आग्रह सोडला नाही. त्यामुळे भाजपाने आपल्या आवडीचा उमेदवार देण्यास शिंदे यांना राजी केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी या मतदारसंघात खूप जोर लावला होता. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रचार सभा घेतली होती. परंतु माजी मंत्री काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी ही निवडणूक अगदी तन, मन आणि धनाने लढली. काँग्रेसची नागपूर जिल्हा परिषदेत सत्ता आहे. त्याचा अगदी चांगल्या उपयोग करून सुनील केदार यांनी बर्वे यांच्या पाठिमागे ताकद उभीर केली होती. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ताकद पणाला लावली होती.
पारवे यांच्यासमोरील आव्हान लक्षात घेऊन भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा रामटेक मतदारसंघात घेतली. तसेच एकनाथ शिंदे हे दोन वेळा येथे आले. अपक्ष आमदार आशीष जयस्वाल शिंदे सेनेसोबत आहेत. परंतु, जुने शिवसैनिक नाराज आहेत. काँग्रेसचे बंडखोर किशोर गजभिये अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीने समर्थन दिले होते. तसेच बसपचे संदीप मेश्राम हे देखील रिंगणात होते. या दोन्ही उमेदवारींनी धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी केल्याचे दिसून येत नाही.