लोकसत्ता टीम
वाशीम : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे. सरकारने जाहीर केलेल्या योजना फसव्या असून या योजनेचा भांडाफोड करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून आजपासून ‘होऊ द्या चर्चा’ अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून होऊ द्या चर्चा “अभियानाला जिल्ह्यात १ ऑक्टोंबर ते १२ ऑक्टोंबर दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने दुसरा टप्पा राबविण्यात सूरवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील रिसोड विधानसभेसाठी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले, वाशीम विधानसभेकरिता जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप जाधव, कारंजा विधानसभेकरीता माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार या प्रमुख नेत्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
आणखी वाचा-ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून वाघ नखांना महत्त्व – सुप्रिया सुळे
केंद्र आणि राज्य सरकार च्या नाकर्तेपणाला सर्वसामान्य जनता कंटाळली आहे. प्रचंड महागाई, बेरोजगारी व सत्ताधाऱ्यांच्या बोलघेवडेपणामुळे जनता मेटाकुटीला आली असल्याचा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाकडून या अभियानात केला जात आहे.