Sushma Andhare on Sanket Bawankule Nagpur Accident: नागपूरमध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचे नाव घेतले गेल्यामुळे हे प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. रविवारी (दि. ८ सप्टेंबर) मध्यरात्रीनंतर अनेक वाहनांना धडक देणाऱ्या ऑडी कारमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे चालकाच्या शेजारी बसून होता, असे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी प्रसारमाध्यमांना सांगितल्यानंतर याविषयी अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आज शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांन सीताबर्डी पोलीस ठाणे गाठून पोलिसांना अनेक प्रश्न विचारले. तसेच संकेत बावनकुळे गाडीत उपस्थित असतानाही त्याची वैद्यकीय तपासणी का झाली नाही? त्याचे नाव एफआयआरमध्ये का नाही? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

संकेत बावनकुळेला प्रत्यक्षदर्शींकडून चोप

रविवारी मध्यरात्री मानकापूर मार्गे कोराडीला जात असताना वाटेत का वाहनांना संकेत बावनकुळे बसलेल्या कारने धडक दिली. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी संकेत बावनकुळे आणि इतरांना पकडून चोप दिला, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला. प्रत्यक्षदर्शींनी चोप दिल्यानंतर आरोपींना पोलीस ठाण्यात आणण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्यातून वाचण्यासाठी संकेत बावनकुळे वाहनासह पळून गेला. त्यामुळे रामदास पेठेत आणखी तीन वाहनांना धडक दिली गेली. या तीन वाहनांपैकी एक वाहन नागपूर प्रेस क्लबचे कर्मचारी जितेंद्र सोनकांबळे यांची होती. जितेंद्र सोनकांबळे यांनी रात्रीच एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी तक्रार घेतली नाही, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Viral video shows car hitting woman distracted by phone the Internet is stunned by what she does next
फोनमध्ये पाहत रस्ता ओलांडते महिला, कारने दिली जोरदार टक्कर अन्…, थरारक अपघाताचा Video Viral
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Worli hit and run case, High Court, Mihir Shah claim,
वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण : गुन्हा करताना सापडल्यानंतरही अटकेचे कारण सांगणे अपरिहार्य ? मिहिर शहाच्या दाव्यावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
DY Chandrachud on euthanasia case
Ex CJI DY Chandrachud: शेवटच्या दिवशी न्या. चंद्रचूड यांचा महत्त्वाचा निकाल; मुलाच्या इच्छामरणाची मागणी करणाऱ्या पालकांना दिला दिलासा
bund garden road, attack on youth, Pune,
पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा

हे वाचा >> “संकेत बावनकुळेंच्या गाडीमध्ये दारूसह बीफ कटलेटचं बिलं आढळलं”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, “भाजपाने हिंदुत्व..”

नेमके प्रकरण काय?

रविवारी (दि. ८ सप्टेंबर) मध्यरात्री संकेत बावनकुळे आणि त्याचे दोन मित्र अर्जून जितेंद्र हावरे (२४) आणि रोनित चिंतमवार (२७) धरमपेठमधील लाहोरी हॉटेलमध्ये गेले होते. मध्यरात्री साडेबाराला ते ऑडी मोटारीतून बाहेर पडले. सेंट्रल बाजार रोडवरुन भरधाव जात असताना सेंटर पॉईंट हॉटेलसमोर त्यांनी जितेंद्र सोनकांबळे याच्या मोटारीसह तीन वाहनांना धडक दिली. अपघात झाला त्यावेळी संकेत दोन्ही मित्रांसह कारमध्येच होता. मात्र, सीताबर्डी पोलिसांनी अर्जुन हावरे आणि रोनित चिंतमवार यांनाच ताब्यात घेतले होते. संकेतचे नाव एफआयरमध्ये नव्हते.

फिर्यादीच्या जीवाला धोका?

सीताबर्डी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या की, हिट अँड रन प्रकरणाची तक्रार दाखल करणाऱ्या फिर्यादीवर प्रचंड दबाव आहे. जितेंद्र सोनकांबळे हे अनुसूचित जातीचे असून त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे. मला त्यांच्या जीवाची जास्त काळजी वाटते. सोनकांबळे यांना पोलीस संरक्षण दिले गेले पाहीजे, अशी आमची मागणी आहे, असेही त्या म्हणाल्या.

त्यांनी बीफ खाल्ले

संकेत बावनकुळे आणि त्याच्या मित्रांनी लाहोरी बारमध्ये बीफ कटलेट खाल्ले असा आरोप सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांनी केला. त्यावरून संजय राऊत यांनी म्हटले की, “संकेत बावनकुळे यांच्या गाडीमध्ये एका लाहोरी बारचं बिल मिळून आलं. त्यामध्ये संकेत बावनकुळे यांच्या खाण्या-पिण्याचा उल्लेख आहे. या बिलावर दारू, चिकन, मटणासह बीफ कटलेटचाही समावेश आहे. मग हिंदूत्व शिकवणाऱ्या लोकांनी बीफ कटलेट खाल्ले आहे. मग भाजप हिंदूत्व शिकवणार का?”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.