अमरावती : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारीत झाल्यानंतर राज्यभरात सर्वत्र आक्रोश पाहायला मिळत आहे. याबरोबरच अमरावतीमध्ये देखील याचे पडसाद उमटले आहेत. ठाकरे गटाच्या संतप्त शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून किरीट सोमय्याचा जाहीर निषेध करत जोडे मारो आंदोलन केले आणि पुतळ्याला प्रतिकात्‍मक फाशी दिली.शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या नेतृत्वात हे निषेधात्‍मक आंदोलन करण्यात आले.

राजकमल चौकात ठाकरे गटाचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन घोषणाबाजी करत जोडे मारो आंदोलन केले. नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
सभ्यता व सुसंस्कृतपणाचा आव आणून अनेक राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांचा खरा चेहरा अश्लील आक्षेपार्ह व्हिडिओने समोर आला असून अशा नग्न व अश्लीलतेचे प्रदर्शन मांडणाऱ्या सोमय्या यांचा शिवसेनेने निषेध करीत कारवाईची मागणी केली आहे.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर

हेही वाचा >>>सोमय्या यांच्यावर महिला नेत्यांची टीका, म्हणाल्या ‘ त्यांचे आचरण भाजप संस्कृतीप्रमाणेच’

हेही वाचा >>>VIDEO: इकडे मान्सूनचा वेग वाढला… आणि पक्ष्यांची वीण घट्ट होऊ लागली

या आंदोलनात शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, माजी आमदार ज्ञानेश्‍वरा धाने पाटील, प्रदीप बाजड, वर्षा भोयर, ज्योती औगड, कांचन ठाकूर, पियू ठाकूर, स्नेहल ठेंगरे, प्रतिभा बोपशेट्टी, राजश्री जठाळे, सारिका जयस्वाल, अस्मा शेख, लक्ष्मी शर्मा, शाम धाने, शुभम जवंजाळ, संजय गव्हाळे, विकास शेळके, याह्या खा पठाण, अक्रम पठाण, विजय खंडारे, प्रकाश तेटू, पंजाबराव तायवाडे, मनोज अग्रवाल, संजय गोंडाने, महेश शेंडे, धनराज शेंडे, विजय बेनोडेकर, निलेश सावळे, मोहन क्षीरसागर, दिलीप काकडे, अजय बोबडे, अमोल कंकाळे, प्रमोद देशमुख, अरुण शेळके, वैभव हरणे, बंटी जामोदकर, मोहन काळे, दिनेश बेलगे, आकाश वाकोडे, भूषण भिसे, विनोद खडसे, गजु बिहार, सागर ढोके, महेश पवार, प्रशांत ठेंगरे, योगेश विजयकर, सचिन ठाकरे, शुभम पंचवटे, कैलास औगड आदी सहभागी झाले होते.

Story img Loader