अमरावतीकर शिव ठाकरे सध्या ‘बिग बॉस १६’ या पर्वामुळे चांगलाच चर्चेत आहे. ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये उत्तम खेळ खेळत शिव ठाकरेने चाहत्यांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. शिव ठाकरे हाच यंदाच्या पर्वाचा विजेता ठरणार, अशा सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत. त्याच्या कुटुंबीयांनी देखील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. शिव ठाकरे याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. एक वेळ तर त्याने घराजवळच्या यात्रेत नारळांची विक्रीही केली होती.लहानपणापासून त्याला नृत्य आणि खेळाची आवड होती. क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात तो पुढाकार घ्यायचा. गणेशोत्सवाच्या काळात अनेक कार्यक्रमांमध्ये तो सहभाग घ्यायचा, त्यातही त्याने बक्षिसे मिळवली. यावेळीही तो नक्कीच जिंकेल, असा विश्वास शिवच्या आई आशा ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा