नागपूर : महाविकास आघाडीसह आणि राहुल गांधी यांच्याक़डे विकासाचे कुठलेही व्हीजन नाही. केवळ जाहीर सभामधून खोटी आश्वासन देत जनतेची दिशाभूल करतात. राज्यामध्ये महाविकास आघाडीकडे विकासाचे कुठलेही मॉडेल नसून ही केवळ महाविनाश आघाडी असल्याची टीका केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवराजसिंह चौहान नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी शिवराज सिंह म्हणाले. राहुल गांधी देशात एक आणि विदेशात वेगळे वक्तव्य करुन जनतेची दिशाभूल करतात. राज्यात महाविनाश आघाडी तयार करण्यात आली आहे. त्याच्याजवळ विचार, व्यवहार आणि कुठलीही निती नाही. जाती व धर्मावर केवळ राजकारण करण्याचे काम आघाडी सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केली. मध्यप्रदेशमध्ये राबविण्यात आलेली लाडली बहीण योजना यशस्वी झाली आहे. तेथील गोरगरीबांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी योजना सुरू केल्यानंतर अनेक महिलांंनी त्याच्या भरवश्यावर स्वत:चे उद्योग सुरू केले आहे.

हेही वाचा…प्रियंका गांधी यांची प्रतीक्षाच, पण बघ्यांची मोठी गर्दी

मध्यप्रदेश सरकार ही योजना चांगल्या पद्धतीने राबवित असून त्यासाठी १६ हजार कोटीची तरतुद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्या स्तरावर विविध योजना राबविल्या जात आहे. महाराष्ट्रात ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने सुरू असून लाखो महिलांना याचा लाभ मिळत नाही. महिलांचा सन्मान करणे ही महायुतीची संस्कृती आहे. त्यांनी जाहिरनाम्यात महिलांना तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली मात्र काँग्रेसच्या घोषणा या फसव्या असतात अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा…‘मामु’ फॅक्टर चालणार?, दलितांसह इतरांचे एकगठ्ठा मतदान…

सोयाबीन शेतकऱ्यांना अधिक मदत केली जात आहे.

पामतेलावरील आयात शुल्क शून्यावरून २७.५ टक्क्यांपर्यंत वाढवून सोयाबीनच्या घसरलेल्या किमतींबाबत सरकारच्या प्रतिसादावर प्रकाश टाकला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केलेल्या मदत उपायांचाही उल्लेख केला आणि कृषी क्षेत्राला पाठिंबा देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला. महाविकास आघाडी फसवणूक करणाऱ्यांची युती आहे. अशी टीका त्यांनी केली

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivraj singh chauhan maha vikas aghadi and rahul gandhi mislead the public with false promises and no development vision vmb 67 sud 02