देवेंद्र फडणवीस यांना खुर्चीचा मोह असल्यामुळे त्यांनी शिवसेनेमध्ये फूट पाडली. शिंदेच्या बंडामागचे खरे सूत्रधार फडणवीस हेच आहेत. ते इतरांना फोडण्याचा प्रयत्न करीत असले तरी, भाजपातच फडणवीस आणि गडकरी अशी फूट पडली आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.

हेही वाचा- वर्धा: बारावीच्या विद्यार्थ्याजवळ भ्रमणध्वनी आढळून आल्याने खळबळ; केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकावर कारवाईचा बडगा

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “आम्हाला ‘बटेंगे तो कटेंगे’ सांगणारे अशावेळी जातात कुठे?” बेळगावच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल

शिवगर्जना अभियानच्या मेळाव्यानिमित्त शहरातील विठ्ठलवाडी मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे शरद कोळी, दिलीप जाधव, दुर्गा शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. खैरे म्हणाले की, भाजप देशात खोक्याची भाषा वापरून विरोधकांमध्ये फूट पाडण्याचे पाप करीत आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार नाही. तिथे पैशाच्या जोरावर भाजप विरोधकांना संपवण्यासाठी षडयंत्र रचत आहे. मात्र, देशात भाजपला उतरती कळा लागली आहे. अनेक ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचा पराभव होत आहे. आज आम्ही संकटात असलो तरी, येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप १५० खासदारांच्या पुढे जाऊ शकत नाही, असा दावाही त्यांनी केला.

हेही वाचा- खळबळजनक! देशात जानेवारी व फेब्रुवारीत एकूण ३४ वाघांचा मृत्यू

शरद कोळी यांनी आपल्या रोखठोक भाषणात गद्दारांना धडा शिकवण्याचे आव्हान शिवसैनिकांना केले. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने शिवसेना आणि पक्ष चिन्हाचा निकाल देताना पक्षपात केला. या देशातील घटनात्मक संस्था केवळ दबावापोटी आणि पैशापोटी जर चुकीचे निकाल देत असतील तर सामान्य जनतेने कुणाकडून आशा बाळगावी, या देशात लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम भाजपचे सरकार करीत असून जनतेने वेळीच सावध झाले पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Story img Loader