ठाकरे परिवारावरील टीका आम्ही खपवून घेणार नाही, हे किरीट सोमय्यांनी लक्षात घ्यावे. अन्यथा आम्हाला सत्तेचीदेखील पर्वा राहणार नाही, असा इशारा शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. माजी खासदार व भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करताना सोमय्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यावरून शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान, याच प्रकारावरून बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ते म्हणाले की, “किरीट सोमय्यांनी असे समजायला नको की हे लोक शिवसेनेपासून वेगळे झाले आहेत किंवा वेगळा गट निर्माण केला आहे. आम्ही शिवसेनाच आहोत. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याविषयी आमची निष्ठा संपली व त्यांना शिव्या-शाप देऊन आम्ही बाहेर पडू असा अर्थ त्यांनी मूळीच लावू नये”.

“माझ्या मुलांना आयुष्यातून उठवण्यापर्यंत यांचे प्रयत्न चालले होते,” उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

“भाजपा-सेना म्हणून सरकार असतांना यापुढे त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य करू नये. नाही तर आम्हाला सत्तेची पर्वा राहणार नाही,” असंही ते म्हणाले आहेत.

Video: सेनेच्या बंडखोर आमदाराने ‘डोळ्यात डोळे घालून बोला’वरुन उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली; म्हणाला, “त्यांचे डोळे…”

विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच संजय गायकवाड यांनी डोळ्यांवरून आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली होती. आता त्यांनीच ठाकरे कुटुंबियांविषयी निष्ठा असल्याचे सांगून किरीट सोमय्यांना खडे बोल सुनावले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay gaikwad threatens bjp over kirit somaiya uddhav thackeray aditya thackeray sgy