नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्यावतीने रेशीम बागेतील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात प्रशिक्षण शिबीर झालं. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटावर टीकास्र डागलं होतं. राज्य सरकारविरुद्ध लोकांत असलेली खदखद नक्की बाहेर येईल. गद्दारांना शिवसेना धडा शिकवेलच. पण, पन्नास खोके एक ओके तुम्हालाही विसरायचे नाही, असं आवाहन अजित पवारांनी केलं होतं. यावर शिवसेना ( शिंदे गट ) खासदार कृपाल तुमाने भाष्य केलं आहे.

नेमकं अजित पवार काय म्हणाले?

“राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना केंद्राकडून अपेक्षित सहकार्य झाले नाही. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाहीत,” असा सवाल करून अजित पवारांनी म्हटलं, “गद्दारीला वर्ष होईल. निवडणुका घेण्यापासून त्यांना कुणी अडवलं? काय होईल ही धास्ती त्यांना वाटत आहे. विधानपरिषदेत राज्यकर्त्यांचा पराभव झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.”

Nagpur accident
नागपूर: मंगळवार ठरला घातवार, तीन अपघातात चार ठार
bjp district president honored
भंडारा : महायुतीचा उमेदवार हरला, तरी भाजप जिल्हाध्यक्षाचे…
tekdi Ganpati Devendra fadnavis
‘मुख्यमंत्री देवाभाऊच!’ नागपुरात भाजप महिला आघाडीचे टेकडी गणपतीला साकडे..
ashwini vaishnaw railway jobs
“रेल्वेत गेल्या दहा वर्षांत ५ लाख जणांना नोकऱ्या”, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा दावा
Nitesh karale master
बिच्चारे कराळे गुरुजी! मार खाल्ला, मतंही गेली; आता कारवाई…
Cyber criminals are creating fake websites and cheating customers who contact listed numbers
धक्कादायक अन् धोकादायकही, सायबर गुन्हेगार बनवताहेत कंपन्यांचे बनावट संकेतस्थळ!
Amravati mla ravi rana mla sulbha khodke
अमरावती : तीन आमदारांना मंत्रिपदाचे वेध! कुणाची वर्णी लागणार?
nana patole abused in call recording
भंडारा : नाना पटोले यांच्याबद्दल अपशब्द, शिवीगाळ; व्हायरल ऑडियो क्लिपने खळबळ

हेही वाचा : शरद पवारांच्या मध्यस्थीनंतरही शिरूर मतदारसंघाचा तिढा सुटेना? विलास लांडेंच्या वक्तव्यानंतर चर्चेला पुन्हा सुरुवात

“राज्य सरकारविरुद्ध लोकांत असलेली खदखद नक्की बाहेर येईल. गद्दारांना शिवसेना धडा शिकवेलच. पण, पन्नास खोके एक ओके तुम्हालाही विसरायचे नाही,” असे अजित पवारांनी सांगितलं.

“झोपताना आणि सकाळी उठल्यावर खोके पाहणारे लोक…”

याबद्दल नागपुरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी कृपाल तुमाने यांना प्रश्न विचारला. त्यावर तुमाने म्हणाले की, “अर्थमंत्री असताना अजित पवारांनी किती खोके जमवले ते सांगावं. खोक्याशिवाय अजित पवार काम करत नव्हते. झोपताना आणि सकाळी उठल्यावर खोके पाहणारे लोक खोक्यांवरच बोलतात,” असा गंभीर आरोप तुमाने यांनी अजित पवारांवर केला आहे.

हेही वाचा : सिंधुदुर्गातून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, “आधीच्या सरकारने…”

“भाजपा आणि शिवसेना युतीत लढणार”

“आम्ही लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो असून, भाजपा आणि शिवसेना युतीत लढणार आहे. तीन महिन्यांत शिवसेना आणि भाजपाचे संयुक्त मेळावे घेण्यात येणार आहेत,” अशी माहिती कृपाल तुमाने यांनी दिली.