नागपूर: आपल्या घणाघाती भाषणामुळे शिवसैनिकांमध्ये ऊर्जा निर्माण करणा-या व विरोधकांची तोंडे बंद करणा-या शिवसेना उपनेत्या (उध्दव ठाकरे गट) सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा गुरूवारी नागपुरात दाखल झाली असून सायंकाळी ६ वा. त्यांची जाहीर सभा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. हे शहर भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर आहे तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुध्दा नागपूर जिल्ह्याचेच प्रतिनिधित्व करतात.

हेही वाचा… वर्धा : वीस वर्षापासून ‘येथे’ ना वीज, ना नळ, ना शौचालय…

नागपूर शहर भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेना फोडण्यात भाजप विशेषतः देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका असल्याने शिवसेना उध्दव ठाकरे गट भाजपवर संतापला आहे. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे आजच्या सभेत नेमके काय बोलणार? कोणाला लक्ष्य करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.