नागपूर : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील घराची दोन जणांनी रेकी केली. त्या दोघानांही लवकरात लवकर अटक करण्यात यावी. तसेच संजय राऊत यांच्या सुरक्षेत आणि घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली.

आपण दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांना भेटलात याचे कारण काय, असे विधान भवन परिसरात पत्रकारांनी विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले, संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्याकरिता दोन युवक दुचाकीने आले होते. ते कशासाठी आले होते. त्यांचा उद्देश काय होता, याची पोलिसांनी त्वरित तपास करून त्यांना अटक करण्याची गरज आहे. आम्ही या सत्रात वेगवेगळे विषय मांडून चर्चा करत असतो. एकमेकांवर टीकाटिप्पणी करत असतो. मात्र, कधी या टोकापर्यंत राजकरण पोहचले नव्हते. आज काही लोकांनी संजय राऊत यांच्या घराची रेकी केली. मागील काही दिवसात राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. विविध घटना घडत आहेते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याने पुढील पाच वर्षांत अनेक भेटी होतील ही अपेक्षा आहे. सत्ताधारी आणि विरोधी एकत्र येऊन ज्या घटना घडत आहे यावर उपाययोजना व्हायला हव्यात. दोन्ही बाजू मिळून कार्य करतील तर सुसंस्कृत महाराष्ट्र निर्माण होईल.’

anil Deshmukh Devendra fadnavis
‘गुड गव्हर्नन्स’ अहवालावरून माजी गृहमंत्र्यांकडून फडणवीस यांच्यावर टीका
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
Sanjay Raut Answer to Eknath Shinde
Sanjay Raut : “बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कुणी गद्दारी केली हे…”, संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेंना उत्तर
Eknath Shinde Shivsena Demand
Shivsena : “बाळासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवा”, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
Sanjay Raut Answer to Amit Shah
Sanjay Raut : संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”
devendr fadnavis sanjay raut
“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…
Aditya Thackeray meets Devendra Fadnavis for the third time in a month Mumbai news
आदित्य ठाकरे महिनाभरात तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

हेही वाचा : ‘एमपीएससी’चा ढीसाळपणा : निकालाच्या तीन महिन्यांपासून संपूर्ण प्रक्रिया रखडली…

एकनाथ शिंदेवर टीका

मागचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनाबाह्य आणि कंत्राटी पद्धतीवरील मुख्यमंत्री होते, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Story img Loader