नागपूरजवळील रामटेक हे हिंदू धर्मियांचे पवित्र धार्मिक स्थळ मानले जाते. शहरापासून ५० किलोमीटरवर असणाऱ्या रामटेकला पौराणिक, अध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. श्रीराम वनवासात असताना येथे वास्तव्यास होते, असा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. अशा रामाच्या भूमीत आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत शिवसृष्टी, उद्यान, संग्रहालय व शिवकालीन थीम पार्क उभारण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – फडणवीस यांच्या अभियानात नागपूर राज्यात अव्वल

महाराष्ट्र शासनाने अलीकडेच सहा शिवसृष्टी प्रकल्पांची घोषणा केली. रामटेकचा प्रकल्प त्यापैकीच एक. शिवसृष्टीसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवसृष्टी, उद्यान आणि संग्रहालय, थीम पार्कच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना शिवरायांचा गौरवशाली इतिहास अनुभवता येईल. रामटेकचा पर्यटन केंद्र म्हणूनही विकास केला जात आहे. येथे अनेक पौराणिक मंदिरे आणि मोठा तलावही आहे. येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. शिवसृष्टीमुळे त्यात आणखी भर पडणार आहे.