सिंदखेडराजात माजी मंत्री राजेंद्र शिंगणेंचा धक्कादायक पराभव; बुलढाण्यात संजय गायकवाड विजयी

प्रचारापासून मतदान आणि मतमोजणीपर्यंत काट्याची दुरंगी लढत ठरलेल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघात अखेर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (महायुती) यांनी बाजी मारली आहे.

defeat Rajendra Shingne Sindkhed Raja, Buldhana,
सिंदखेडराजात माजी मंत्री राजेंद्र शिंगणेंचा धक्कादायक पराभव; बुलढाण्यात संजय गायकवाड विजयी (image credit – @sanjaygaikwad34/twitter X/Dr.Rajendra B. Shingne fb/file pic/loksatta graphics)

बुलढाणा: प्रचारापासून मतदान आणि मतमोजणीपर्यंत काट्याची दुरंगी लढत ठरलेल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघात अखेर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (महायुती) यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांचा ६६१ मतांनी पराभव करीत विजयश्री अक्षरशः खेचून आणली. मतांचे विभाजन आणि नामसाध्यर्म असलेल्या उमेदवाराने घेतलेली मते याचा शेळके यांना फटका बसल्याचे चित्र आहे.

आज शनिवारी, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास तहसिल कार्यालयमागील निवडणूक विभागाच्या नवीन इमारतीत मतमोजणीला सुरुवात झाली. प्रारंभी पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. पोस्टलमध्ये शेळकेनी बाजी मारली असली तरी आमदार गायकवाड यांनी पाहिल्या फेरीत आघाडी घेतली. मात्र मतमोजणी एखाद्या सरपंच पदाच्या निवडणुकी सारखे चढ उतार दिसून आले. कधी गायकवाड यांना अल्प आघाडी तर कधी शेळके अल्प मतांनी पुढे असा खेळ सुरू राहिला. यामुळे अंतिम म्हणजे २५ व्या फेरी पर्यंत लढतीचा रोमांच कायम राहिला २४ व्या फेरीपर्यंत कोणाच्याही विजयाची खात्री नसल्याने २५ वी अंतिम फेरी निर्णायक ठरली. यात संजय गायकवाड यांनी बाजी मारली आणि ते सलग दुसऱ्यांदा आमदार झाले. महायुतीचे संजय गायकवाड यांना ९० हजार ४५७ मते मिळाली. आघाडीच्या जयश्री शेळके यांना ८८ हजार ९८४ मते मिळालीत.

जयश्रीं शेळकेंच्या हार मध्ये ‘जयश्री शेळकें’चा हातभार

वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत वाघोदे यांना केवळ ७०८४ मते मिळाली असली तरी त्यांनी आमदार गायकवाड यांच्या विजयात आणि आघाडीच्या जयश्री शेळके यांच्या पराभवात मोठा वाटा उचलला. लढतीत आघाडीच्या जयश्री सुनील शेळके यांच्यासह जयश्री रवींद्र शेळके या देखील होत्या. नाम साधर्म्यचा देखील आघाडीला फटका बसला. याचे कारण जयश्री रवींद्र शेळके यांना ६३८ मते मिळालीत.

हेही वाचा – वर्धा जिल्ह्यात चौफेर भगवा; देवळीत इतिहास, आर्वीत ओन्ली सुमित, वर्धा व हिंगणघाट येथे हॅटट्रिक

रिंगणातील अन्य उमेदवारांमुळे झालेल्या मत विभाजनाचा जास्त फटका आघाडीला बसल्याचे मानले जात आहे. यामुळे अटीतटीची लढत, झुंज देऊनही तीन आकडी फरकाने झालेला पराभाव जयश्री शेळके यांच्यासाठी न भरून निघणारी राजकीय जखम ठरली. यामुळे महाविकास आघाडीला देखील ‘जोर का झटका धिरे से लगे’ या धर्तीवर मोठा धक्का लागला आहे. दुसरीकडे या चुरशीच्या लढतीत तब्बल १६६० मते ‘नोटा’ ला मिळाली वा देण्यात आली.

राजेंद्र शिंगणे यांचा नामुष्कीजनक पराभव

सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच आले नाही हा संदेश देत सिंदखेडराजा मतदारसंघातील मतदारांनी नव्या दमाच्या मनोज कायंदे (राष्ट्रवादी अजितदादा गट) यांना विजयी केले आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाची लढत आणि मतमोजणी देखील अत्यंत चुरशीची झाली. प्रारंभीच्या टप्प्यात तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले मनोज कायंदे यांनी एकदम उसळी मारली असून त्यांचा विजय झाला आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांना मात्र नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

हेही वाचा – शिवसेनेसोबत बंडखोरी केलेल्या जागेवर काँग्रेस पिछाडीवर, सांगली पॅटर्न अपयशी

अगदी वेळेवर तिकीट मिळूनही मनोज कायदे यांनी दमदार प्रचाराचे नियोजन केले. शेवटच्या दोन-तीन दिवसात मनोज कायंदे यांची लाट निर्माण झाली. आज ही लाट विजयात परावर्तित झाली आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये मनोज कायंदे १० हजार मतांनी मागे होते. मात्र ती आघाडी त्यांनी मोडून काढली. २५ फेऱ्याअंती मनोज कायंदे यांना ७२ हजार २५६ मते, दुसऱ्या क्रमांकावरील डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ६७ हजार ५५३ तर तिसऱ्या क्रमांकावरील डॉ. शशिकांत खेडेकर यांना ५९ हजार ८३८ मते मिळाली. ४ हजार ९९२ मतांनी मनोज कायंदे यांचा विजय झाला आहे. हा विजय मनोज कायंदे यांनी जनतेला समर्पित केला आहे, आज दिवंगत वडिलांची आठवण होत असल्याचे मनोज कायंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shocking defeat of former minister rajendra shingne in sindkhed raja sanjay gaikwad won in buldhana scm 61 ssb

First published on: 23-11-2024 at 16:12 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या