नागपूर : पुण्यावरून नागपूरला येणाऱ्या विमानात बाजुच्या सीटवर बसलेल्या अभियंत्याने महिला डॉक्टरला बघून अश्लील इशारे केले. त्यानंतर तिच्याशी चाळे करून विनयभंग केला. महिलेने विमानातून खाली उतरताच अभियंत्याची कॉलर धरुन खेचले आणि चांगला चोप दिला. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. फिरोज शेख नूर मोहम्मद शेख (कोडवा, पुणे) असे आरोपी अभियंत्याचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पीडित ४० वर्षीय महिला डॉक्टर पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात नोकरी करते. तिला माहेरी चंद्रपूरला जायचे असल्याने सोमवारी पुणे-नागपूर विमानात बसली. तिच्या बाजुच्या सीटवर आरोपी फिरोज शेख बसला होता. तो बराच वेळ तिच्याकडे बघून अश्लील इशारे करीत होता. मात्र, डॉक्टरने दुर्लक्ष केले. त्यानंतर त्याने मोबाईल समोर ठेवून अश्लील चित्रफिती आणि छायाचित्र बघणे सुरु केले.

हेही वाचा >>> नागपूर : गंगाजमुनातील तरुणींचा खापरखेड्यात देहव्यापार

महिला डॉक्टरने कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने त्याने काही वेळातच तिच्या पाठीला स्पर्श केला. विमानातून खाली उतरताना तिच्याशी अश्लील चाळे करीत मोबाईल नंबर मागितला. चिडलेल्या महिलेने त्याची कॉलर धरली आणि विमानाबाहेर खेचले. खाली उतरताच त्याला चांगला चोप दिला. काही प्रवाशी आणि सीआयएसएफच्या जवानांच्या ताब्यात दिले. सोनेगावचे पोलीस उपनिरीक्षक अशोक वाघ यांनी गुन्हा दाखल करून अटक केली.