लोकसत्ता टीम

वर्धा : विविध वादातून भांडणे व मारामारी होण्याचे प्रकार नात्यात नवे नाहीत. मात्र थेट गोळीबार करीत जीवघेणा हल्ला करण्याची बाब थरकाप उडविणारी ठरावी. झाले तसेच. मध्यरात्री ही घटना दत्तपूर बायपास येथे घडल्याचे उघडकीस आले आहे.

Marijuana worth six lakh rupees seized in Parbhani
परभणीत सहा लाख रुपये किमतीचा गांजा जप्त
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Gujarat Police officer son robbed in pune news
पुणे: गुजरातमधील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला नदीपात्रात लुटले
Ratnagiri crime news
रत्नागिरीतील खून प्रकरणातील फरार आरोपीला मंगळवेढा येथून अटक, पिस्तूलासह ५ जिवंत काडतुसे हस्तगत
meghwadi police arrested accused with two pistols live cartridges and 10 lakh
दोन पिस्तुल आणि १० लाख रुपयांच्या रोख रकमेसह सराईत आरोपीला अटक
bombay hc grants bail to 20 year old college student in father murder case
वडिलांच्या हत्येतील आरोपीला जामीन; आरोपीच्या भविष्याच्या दृष्टीने उच्च न्यायालयाचा निर्णय
mhalunge police arrested house robber seizing 26 jewelry pieces worth ₹18 lakh
घरफोडीतील आरोपी टी-शर्टच्या आधारे ओळखून पकडला
Mumbai crime
मुंबई : आरोपीचा न्यायालातून पळून जाण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

आरोपी राहुल वाघमारे याने त्याचा चुलत आते भाऊ असलेल्या हर्षल झाडे याच्यावर छोट्या बंदुकीने गोळया झाडल्या. आरोपीजवळ दहा गोळया होत्या. त्यापैकी तीन झाडण्यात आल्या. एक गोळी मात्र हर्षलच्या मांडीस लागली. गोळीबार करीत आरोपी फरार झाला. गोळी लागल्याने जखमी हर्षल पळत पळत पत्नीकडे पोहचला. पत्नीने त्यास सेवाग्रामच्या रुग्णालयात दाखल केले. जखमी हर्षलवर आता उपचार सुरू आहे.

आणखी वाचा-ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन पंजाबमध्ये, नियोजनासाठी ५ ला बैठक

हर्षल याने केलेली प्रगती आरोपीच्या डोळ्यात भरली. त्या इर्षेतून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. सेवाग्राम पोलीस ठाण्यातील हवालदार सचिन इंगोले याने आरोपी राहुल यास शिताफी दाखवून अटक करण्यात यश मिळविले. सध्या आरोपी सेवाग्राम पोलिसांच्या ताब्यात आहे. राहुल हाच हर्षल यास दत्तपूर मार्गावर काही कारण सांगून घेऊन गेला होतं, असे तथ्य पुढे आले आहे.

Story img Loader