बुलढाणा: आत्महत्या म्हणजे एरवी जगाला आणि जीवनाला कंटाळलेल्या व्यक्तीने उचललेले टोकाचे पाऊल ठरते. सधन, यशस्वी आणि अफाट लोकप्रियता मिळविणारी व्यक्ती देखील आत्महत्या करते तर कफल्लक व्यक्ती देखील आत्मघाताचा मार्ग स्वीकारते.

यासाठी जहाल विष प्राशन करणे, गळफास लावून घेणे, जलाशयात उडी घेणे आणि वरिष्ठ अधिकारी वा परवानधारक असल्यास स्वतःवर गोळी झाडून घेणे या माध्यमाने आत्महत्या करतात. काही जन रेल्वेखाली स्वतःला झोकून देत, उंच इमारत वा पहाडावरून उडी घेऊन, स्वतःवर इंधन ओतून जळून घेत जीवन यात्रा संपवून घेतात. अलीकडे मोबाईल बाधित युवकांमध्ये सोशल मीडिया वर स्टेट्स, स्टोरी ठेवून आत्महत्या करण्याचे फॅड वाढले आहे.

मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील एका युवकाने आत्महत्या करण्यासाठी ‘टोकाचे पाऊल’ उचलले, वेगळ्या प्रकाराचा वापर केला. यामुळे जिल्ह्यात या आत्महत्येची उलट सुलट चर्चा होत आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. नांदुरा तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथील एका २५ वर्षीय तरुणाने वेगळ्याच प्रकारे आत्महत्या केली. त्याने रक्त दाबाच्या (ब्लड प्रेशरच्या) दोनशे गोळ्या खावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पवन महादेव गव्हाळे असे अजबगजब आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

इतक्या गोळया घेतल्यावर पवन गव्हाळे याची प्रकृती गंभीर झाली. घरच्यांनी धावपळ करीत त्याला एका मोठ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. मात्र, उपचारादरम्यान २३ एप्रिल रोजी संध्याकाळी उशिरा त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयाचे कक्षसेवक सुदाम वसाने यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

पवनने एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोळ्या सेवन करून आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही. तो जीवनाला इतका का वैतागला होता, त्यासाठी कारणीभूत कोण असे अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहे