नागपूर: मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या कैद्यावर पाळत ठेवण्यासाठी पोलीसही नियुक्त केले जातात. दरम्यान मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेला एक कैदी एमआरआय काढण्यासाठी पोलिसांसह गेला, परंतु पाच तासांनी पार्टीकरूनच परतल्याची धक्कादायक तक्रार वैद्यकीय अधिक्षक कार्यालयात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेडिकलच्या वार्ड क्रमांक ३६ मध्ये ही घटना घडल्याचे तक्रारीत नमुद आहे. तक्रारीनुसार, २३ वर्षीय कैदी चंद्रपूरचा रहिवासी होता. ३० मे रोजी मध्यरात्री १२.५ मिनिटांनी त्याला मेडिकलला दाखल केले गेले. त्यासोबत चंद्रपूर येथील दोन पोलिस पाळत ठेवण्यासाठी तैनात होते. दुसऱ्या दिवशी सायंकाळी एमआरआय काढण्यासाठी कैदीसोबत जात असल्याचे सांगून पोलिस निघाले. पाच तास उलटून गेल्यानंतरही कैदी आणि पोलिस परत आले नाही. यामुळे वॉर्ड क्रमांक ३६ मध्ये एकच खळबळ उडाली.

हेही वाचा >>> नवरा बाथरूममध्ये जाताच बायको गायब झाली! शेगावमध्ये आक्रीत घडलं!

वॉर्डातील इनचार्ज सीस्टरने तत्काळ मुख्य वैद्यकीय अधिकारी यांना कळविले. त्यानंतर मेडिकलने कैदी निघून गेल्याची नोंद केली. दरम्यान सहसा वॉर्डात दाखल रुग्ण कैद्याला उठता येत नसल्यास सोनोग्राफी, रक्त चाचणीसह कोणत्याही तपासणीसाठी वॉर्डातील अटेंडन्टला सोबत पाठवले जाते. परंतु पोलीस सोबत असल्याने या प्रकरणात अटेन्डन न घेता पोलीसच गेले. परंतु पाच तासांनी पोलीस- कैदी ओली पार्टी करूनच वॉर्डात परतले. सदर माहिती वैद्यकीय अधिक्षक कार्यालयातून पोलिसांनाही दिली गेली.

“पोलीस कर्मचारी वार्डात दाखल कैद्याला एमआरआय काढण्याच्या नावावर घेऊन गेला. वॉर्डात हा कैदी बराच वेळ न दिसल्यामुळे विचारणा केली, तशी परिचारिकांनी नोंद केली. पार्टी करूनच कैदी आणि पोलिस परतले. उपचार करणे डॉक्टरांचे काम आहे. कैद्यांवर पाळत ठेवण्यासाठी पोलिस आहेत. ही माहिती पोलिसांनाही दिली गेली.” – डॉ. शरद कुचेवार, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल