नागपूर : किराणा दुकानाचा व्यवसाय करायचा असेल तर एक लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी देऊन एका गुंडाने भरदिवसा दुकानदारावर गोळीबार केला. ही घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास भरतवाडा परिसरात घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भरतवाडा येथे खेमचंद शाहू (६८) यांचे किराणा दुकान आहे. गुरुवारी शाहू दुकानात बसले असताना आरोपी सन्नी शाहू (२४ रा. आभाताई ले आऊट) त्यांच्या दुकानात गेला. त्याने बंदुकीच्या धाकावर खंडणी मागितली. दुकान चालवायचे असेल तर एक लाख रुपये पाहिजेत, असे म्हणत बंदूक खेमचंद यांच्या दिशेने ताणली. याच दरम्यान सन्नीने गोळी चालवली. सुदैवाने गोळी छताला वरच्या दिशेने लागली. यानंतर सन्नी पळून गेला. विशेष म्हणजे, त्याच्याजवळ कुठलेच वाहन नव्हते. तो पायीच आला आणि पायीच पळाला.

हेही वाचा >>>तेलांगणात कर्जमाफी.. ‘बीआरएस’चा नागपुरात जल्लोश.. पण फटाक्यांवर पाणी..

हेही वाचा >>>केस नीट भादरले नाही म्हणून हल्ला, गुन्हा दाखल

माहिती मिळताच कळमन्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलीस उपायुक्त श्रवण दत्त यांनीही घटनास्थळी भेट दिली. ठाणेदार ठाकूर यांच्या पथकाने वेगवेगळ्या दिशेने शोध घेतला. आरोपी पावनगावच्या नाल्यात लपून असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने घेराव घालून त्याला पकडले. आरोपीवर याआधीच्याही गुन्ह्यांची नोंद आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shopkeeper fired for not paying extortion in nagpur adk 83 amy