बुलढाणा : नवरात्रोत्सवाशी संबधित बुलढाण्यात अनोखी आणि अलिखित परंपरा आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून अर्थात घटस्थापना पासूनच आटपाट बुलढाणा नगरीतील हजारो भाविक अनवाणी दिसतात. नवमी पर्यंत हे चित्र कायम राहते. यामध्ये ‘भरकटलेली किंवा बिघडलेली पिढी’ असा उल्लेख होणाऱ्या तरुणाईचे यात ६० टक्के प्रमाण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंगावर भारी किंमतीची जीन्स, टी शर्ट किंवा आधुनिक फॅशन चा शर्ट, जाकीट, डोळ्यावर गॉगल, केसांचे वेगवेगळे ‘डिझाईन’ , असा जबर थाट पण पायात महागडा बूटच काय स्लीपर देखील नाही. युवतींचा ही असाच ‘लुक’ असतो. भारी महागडे कपडे पण पाय मात्र अनवाणी, यात महिलांचे प्रमाणही मोठे आहे. अंगावर अगदी जॉर्जेट, पैठणी, ‘स्लीवलेस’ असलेली महिलाही बिना पादत्राणे असेच चित्र. नवरात्रोत्सव मध्ये देवीवरील श्रद्धा पोटी हे अनवाणी व्रत पाळले जाते. बुलढाण्यात ही अलिखित परंपरा कधी सुरू झाली हे नक्की सांगता येणार नाही.

हेही वाचा >>> महिलांनी तोकडे कपडे घालणे अश्लीलता नाही, उच्च न्यायालय असे का म्हणाले?

मात्र किमान २५ वर्षांपासून नवरात्रीत अनवाणी व्रत पाळले जात आहे. जग झपाट्याने बदलत आहे, फॅशन ओंगळवणी झाली पण हे व्रत पाळणाऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे. यंदा किमान २५ हजार बुलढाणेकर याचे पालन करीत असल्याचा अंदाज आहे. याविषयी विचारणा केल्यावर बहुतेक ‘साधक’बोलण्याचे टाळतात. काही जण ‘मातेवरील श्रद्धेपोटी करतोय’, असे एका वाक्यात उत्तर देतात. माध्यमाशी संबधित, रणजितसिंह राजपूत यांनी याचे मार्मिक विवेचन केले असून यामुळे श्रद्धा वृद्धिंगत होते, मानसिक समाधान मिळते, तसेच यामुळे ‘पाय जमिनीवर’ राहतात असे ते म्हणाले. अगदी थाटात फिरणाऱ्या नवविवाहित राजू पाटील व त्यांच्या पत्नीने वेगळ्या शब्दात पण हाच अर्थ सांगितला. एका युवकाने नाव न सांगता श्रद्धा आणि थोडाफार ‘ऍक्यु पंक्चर थेरेपी’ चा लाभ होतो असे सांगितले.