नागपूर : स्टेट ट्रान्पोर्ट को -ऑफ बँक ह्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेत भरती, बदली, प्रोत्साहन भत्ता व बोनसच्या नावाने कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. त्यांनी घोटाळ्याबद्दल दिलेल्या महत्वाच्या माहितीबाबत जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एसटी बँकेत नव्याने भरती करण्यात आलेले ११७ तात्पुरते कर्मचारी, बँकेत तात्पुरत्या स्वरुपात घेण्यात आलेले ३० सेवानिवृत्त कर्मचारी व २६७ कायम कर्मचारी यांना देण्यात आलेला प्रोत्साहन भत्ता व बोनसची रक्कम त्यांच्याकडून परत घेण्यात आली असून नवीन कर्मचारी भरतीत सुद्धा करोडो रुपयांचा घोटाळा झाला आहे. वसूल करण्यात आलेली रक्कम कुणालातरी देण्यात आली असून बँकेतील काही बचत खात्यातून झालेल्या अश्या संशयित व्यवहारांची पोलीस खात्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मार्फत चौकशी करण्याची गरज आहे.

हेही वाचा…आठवडी बाजारात निर्घृण हत्याकांड… चुलत भावावर कुऱ्हाडीने थेट…

बँकेत बेकायदेशीर कर्मचारी भरती, संचालकांकडून होणारी उधळपट्टी व इतर सर्व कामकाजाबाबत सहकार आयुक्त व रिझर्व्ह बँकेकडे अनेकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या त्याची चौकशी होऊन तसा अहवाल बँकेच्या पदसिद्ध अध्यक्षांकडे कारवाईसाठी दिला पण त्यांनी कारवाई केली नाही. परिणामी बँक आर्थिक अडचणींत सापडली असून सभासदांना या वर्षीचा लाभांश मिळालेला नाही. कर्ज मिळण्यात अडचणी आल्या आहेत. आता दररोज नव नवीन घोटाळे ऐकायला मिळत असून बँकेच्या पंढरपूर शाखेतील निलंबित केलेल्या एका बँक कर्मचाऱ्याचा विभागीय चौकशी अहवाल वरिष्ठांकडे तातडीने पाठविण्यासाठी १ लाख १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी बँकेच्या कोल्हापूर शाखेचा निरीक्षक राहुल पुजारी , कोल्हापूर हा रंगेहाथ सापडला.

हेही वाचा…पालकमंत्री नियुक्तीबाबत आता बावनकुळेंकडून नवीन तारीख

पुणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने केलेली ही कारवाई अभिनंदनीय असून पोलिसांनी हा तपास पुढे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करून बँकेत करण्यात आलेली बेकायदेशीर भरती, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, बढत्या, कर्मचाऱ्याना देण्यात आलेला बोनस, प्रोत्साहन भत्ता या बाबतीत झालेल्या गैर व्यवहाराचा तपास पुढे सुरू ठेवल्यास त्यांना आम्ही सर्व पुरावे देण्यास तयार असून साधारण २ कोटी २० लाख रुपयांचे संशयित व्यवहार झाले असल्याचे आमचे मत आहे. काहीं खाते क्रमांक व त्यात झालेल्या संशयित व्यवहाराचे पुरावे देण्यास आम्ही तयार असून पोलिसांनी पुढे तपास केला तर तर बँकेत झालेल्या या गैर व्यवहाराच्या मागे कोण आहे हे सुद्धा सिद्ध होईल असेही असेही बरगे यांनी प्रसिद्धीपत्रकातून सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shrirang barge alleged crore rupees scam in recruitment transfers incentives and bonuses at state transport co of bank mnb 82 sud 02