नागपूर : जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट करणे सहज शक्य असते. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी गावातील शुभम येलेश्वर कोमरेवार (वय २६) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.शुभम येलेश्वर कोमरेवार याने साहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय या पदासाठी शुभमने परीक्षा दिली होती. त्यात तो पात्र ठरला. त्यानंतर, तो १ सप्टेंबर २०२३ रोजी मुलाखतीला समोर गेला. परीक्षेत २०० पैकी ११६ गुण आणि मुलाखतीमध्ये ५० पैकी ३५ असे एकूण १५१ गुण मिळवून तो राज्यात प्रथम आला.

शुभमचे वडील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तर आई पदवीधर शिक्षिका आहे. वडील धानोरा पंचायत समितीमध्ये कार्यरत असताना शुभमचे प्राथमिक शिक्षण त्याच तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ईरूपटोला येथे झाले. त्यानंतर ५वी ते १०वी पर्यंत शिक्षण गोंडवाना सैनिक विद्यालय, गडचिरोली येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण त्याने शिवाजी कनिष्ठ विज्ञान विद्यालयात पूर्ण केले. घरची परिस्थिती चांगली असल्याने महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याने नागपूर गाठले. मत्स्य व पशुधन विद्यापीठ, नागपूर येथून त्यांनी मत्स्य विज्ञान शाखेत डिस्टिंक्शन प्राप्त करत पदवी मिळविली. त्यानंतर मास्टर करण्यासाठी भारतातून ३३वा क्रमांक पटकावून तो सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई येथे दाखल झाला.

Rietesh Deshmukh
Riteish Deshmukh : “झापूक झुपूक वारं आलंय, गुलिगत धोका आहे”, धाकट्या बंधूसाठी थोरला बंधू प्रचाराच्या मैदानात!
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
amit shah in jalgaon during campaigning
भाजपचा अल्पसंख्यांकांना आरक्षण देण्यास विरोध; अमित शहा यांच्याकडून भूमिका जाहीर
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Success Story Of Chitraang Murdia
Success Story Of Chitraang Murdia : एकेकाळी होता आयआयटी टॉपर, डॉक्टर होण्यासाठी सगळंच सोडलं; वाचा, चित्रांग मुरडियाची गोष्ट

हेही वाचा >>>अबब! ७ ग्रॅमला ३२ हजार रुपये, सोन्याएवढ्या महाग ‘मॅफेड्रॉन’ मादक पदार्थाची तस्करी

शिक्षण सुरू असतानाच २०१९ ला सरळसेवा भरतीतून सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी पदावर नियुक्ती झाली. या दरम्यान त्यांनी साहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय पदासाठी परिश्रम घेतले. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.