नागपूर : महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पातील एक वीज निर्मिती संच नुकताच बंद पडला होता. त्यापाठोपाठ आता चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रातीलही एक वीज निर्मिती संच बंद पडल्याने महानिर्मितीच्या वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे.

राज्यात अवकाळी पावसामुळे तुर्तास विजेची मागणी कमी आहे. परंतु अधून- मधून विजेची मागणी अचानक वाढते. त्यामुळे गरजेनुसार वीज निर्मिती वाढवण्याचे आवाहन वीज कंपन्यांवर असते. त्यातच महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पातील ६६० मेगावॉटचा वीज निर्मिती संच क्रमांक ८ हा बॉयलर ट्यूब लिकेजमुळे १४ मे रोजी बंद पडला होता. हा संच अद्याप सुरू झाला नाही.

Cylinder explosion on a handcart in front of Shivajinagar court pune news
शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तीनजण किरकोळ भाजून जखमी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
29 villages, Vasai, Vasai latest news, Vasai marathi news,
वसई : २९ गावांचे प्रकरण तापले, सुनावणीची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Cyclone Feingal cleared entire state and once again state is heading towards winter
विदर्भ गारठला… गोंदिया ९.४, तर नागपूर, वर्धा १० अंश सेल्सिअस
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
Satara , development work Satara, code of conduct Satara, Satara latest news,
आचारसंहिता संपल्याने साताऱ्यात दीडशे कोटींच्या विकासकामांना प्रारंभ
water supply Bandra area, Bandra,
मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम

हेही वाचा…खोदकामात २०० वर्ष जुनी इमारत आढळली; अकोल्यातील श्री राजराजेश्वर मंदिरात जीर्णोद्धारादरम्यान…

दरम्यान १७ मेच्या रात्री चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रातीलही ५०० मेगावॉटचा संच क्रमांक ६ बॉयलर ट्यूब लिकेजमुळे बंद पडला. भर उन्हाळ्यात महानिर्मितीचे दोन महत्वाचे वीज निर्मिती संच बंद पडल्याने कंपनीच्या वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, राज्यात १८ मे रोजी दुपारी १.४५ वाजता विजेची मागणी २६ हजार मेगावॉटच्या जवळपास होती. त्यापैकी महावितरणची मागणी २२ हजार २२० मेगावॉट तर मुंबईची मागणी ३ हजार ७०१ मेगावॉटच्या जवळपास होती. सध्या विजेची मागणी कमी आहे. परंतु अचानक मागणी वाढल्यास पुरवठ्यात अडचणी येण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या विषयावर महानिर्मितीच्या अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले की, एक ते दोन दिवसांत दोन्ही संचांची दुरूस्ती होणार आहे.

हेही वाचा…नागपुरात पुन्हा अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये टोळीयुद्ध….एकाचे घरच पेटवले…..

वीज निर्मितीची सद्यस्थिती

राज्यात शनिवारी (१८ मे) दुपारी १.४५ वाजता सर्वाधिक ७ हजार ३६७ मेगावॉट वीज निर्मिती महानिर्मितीकडून होत होती. त्यात औष्णिक विद्युत प्रकल्पातून ५ हजार ६१० मेगावॉट, उरण गॅस प्रकल्पातून ३६० मेगावॉट, जलविद्युत प्रकल्पातून १ हजार ३३१ मेगावॉट, सौर ऊर्जा प्रकल्पातून ५४ मेगावॉट वीज निर्मितीचा समावेश होता. खासगी प्रकल्पांपैकी अदानीमध्ये १ हजार ८२४, जिंदलमध्ये १ हजार ३६, आयडियलमध्ये २३०, रतन इंडियामध्ये १ हजार ७४, एसडब्लूपीजीएलमध्ये ४४२ मेगावॉट वीज निर्मिती झाली. केंद्राच्या वाट्यातून राज्याला ९ हजार ३४९ मेगावॉट वीज मिळाली.

Story img Loader