नागपूर: राज्यात वीजेची मागणी वाढली असतांनाच महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील ६६० मेगावॅटचा एक संच बाॅयलर ट्यूब लिकेजमुळे बंद पडला आहे. राज्याच विजेची मागणी आणखी वाढल्यास पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्याच्या बऱ्याच भागात पावसात खंड पडल्याने पंखे, वातानुकुलीत यंत्रासह कृषीपंपाचा वापर वाढला. त्यामुळे विजेची मागणी वाढून २५ हजार मेगावॅटवर गेली आहे. त्यातच १७ ऑगस्टच्या दुपारी महानिर्मितीच्या कोराडी प्रकल्पातील ६६० मेगावॅटचा एक संच बाॅयलर ट्यूब लिकेजमुळे बंद पडला. त्यामुळे महानिर्मितीची वीज निर्मितीवर परिणाम झाला. महानिर्मितीने ही तुट भरण्यासाठी उरण गॅस प्रकल्पातूनही वीज निर्मिती सुरू केली. याबाबत महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांतच दुरूस्ती होऊन या संचातून वीज निर्मिती सुरू होणार असल्याचा दावा केला.

हेही वाचा… सी. ए. परीक्षेच्या तारखामध्ये बदल, कधी होणार परीक्षा जाणून घ्या…

योग्य नियोजन केल्याने गरजेनुसार सध्या वीज मिळत वीज पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे सांगितले. परंतु राज्यात विजेची मागणी आणखी वाढल्यास वीज वितरणात अडचणी उद्भवण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली. दरम्यान विदर्भात पाऊस पडत असल्याने व पुढे इतरत्र पावसाची शक्यता बघता विजेची मागणी कमी होण्याची शक्यता महावितरणने वर्तवली आहे.