पॅरिसच्या हवामान परिषदेकडून दखल
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आंतरराष्ट्रीय आवाज देण्याच्या हेतूने नागपूरच्या श्वेता भट्टड या चित्रकार महिलेने पॅरिस येथे स्वत:ला तीन तास शवपेटीत कोंडून घेऊन तेथे सुरू असलेल्या हवामान बदलविषयकपरिषदेचे भारतातील शेतीचे प्रश्न आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींकडे लक्ष वेधून घेतले. त्याची दखल घेत येथे जनमंच या शेतीविषयक प्रश्नांवर लढणाऱ्या संस्थेने श्वेताचे ‘कॅफिन’मधील थेट प्रक्षेपण येथे करून या प्रश्नांवर नेत्याची चर्चा घडवून आणली. यावेळी २००६ मध्ये स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा पुनरुच्चारही करण्यात आला.
नागपूरजवळील पारडसिंगा येथील श्वेता भट्टड या चित्रकार काही वर्षांपासून ग्रामीण भागात शेतक री प्रश्नांवर लढत आहेत. पॅरिसमधील हवामान बदलविषयकपरिषदेचे या प्रशांवर लक्ष वेधण्यासाठी जनमंचने त्यांना तेथे पाठविले आहे.
यावेळी जनमंचने केलेल्या चर्चेत शेतकऱ्यांच्या नावावर बियाणे, खते किंवा संबंधित व्यापाऱ्यांनाच अनुदानाचा फायदा कसा मिळतो आणि शेतकऱ्यांचे शोषण केले जाते, याची माहिती उदाहरणे देऊन वक्त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. शेतकरी आत्महत्यांच्या पाश्र्वभूमीवर ‘विष्णू की रसोई’मध्ये झालेल्या या चर्चेच्या वेळी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांनी स्पष्ट केल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा