नागपूर : राज्यात सुरू असलेली लाडकी बहीण योजना ही पैशांची उधळपट्टी आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र ही योजना महाराष्ट्रातील स्त्रीयांची क्रयशक्ती वाढविणारी आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेला चालना देणारी आहे. त्यामुळे या योजनेचा विरोध करण्याचे काही कारण नाही, असे मत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी काँग्रेसच्या प्रचारसभेत व्यक्त केले.

नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रफुल गुडधे पाटील यांच्या एकात्मतानगर परिसरात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. लाडकी बहीण योजनेचे कौतुक करताना भाजपच्या उद्दाम भावांपासून सावध राहून महाविकास आघाडीच्या प्रेमळ भावांना निवडून आणा असे आवाहन श्याम मानव यांनी केले.

Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Raj Thackeray Election
Raj Thackeray : राज ठाकरे निवडणूक का लढवत नाहीत? बाळासाहेब ठाकरेंबरोबरचा ‘तो’ प्रसंग आठवत म्हणाले…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा – नोटांचा चुरा भरलेला ट्रक पेटला, तर्कवितर्क सुरू

म्हणून लाडकी बहीण योजना ‘लाडकी’

लाडकी बहीण योजनेवर सुमारे २६ हजार कोटी रुपये खर्च झाले असे सांगितले जात आहे. मोदी यांनी त्यांच्या आवडत्या उद्योजकांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. या कर्जमाफीमुळे ना रोजगार निर्मिती झाली ना अर्थव्यवस्थेचे भले झाले. दुसरीकडे, लाडकी बहीण योजनेत लाभार्थी असणाऱ्या बहुतांश महिला गृहिणी आहेत. त्यांना प्राप्त होणाऱ्या पैशातून ते आपल्या संसाराला हातभार लावतात. त्या आत्मनिर्भर झाल्या असून त्यांना कुणासमोर हात पसरवावा लागत नाही. करोनानंतर जनसामांन्याची क्रयशक्ती कमी झाली होती. त्यामुळे महिलांना पैसे देऊन त्यांची क्रयशक्ती वाढविणे हे लोककल्याणकारी शासनाचे कार्य आहे. या कारणामुळे या योजनेला विरोध करण्याचे काही कारण नाही. मात्र योजनेच्या नावावर उद्दाम वागणाऱ्या भाजपच्या भावांना धडा शिकवायला हवा आणि महाविकास आघाडीच्या प्रेमळ भावांना निवडून आणून देणे गरजेचे आहे. महाविकास आघाडीने निवडून आल्यावर महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याची आधीच घोषणा केली आहे, असे श्याम मानव म्हणाले. याप्रसंगी पश्चिम नागपूरमधील काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे, ॲड.अभिजीत वंजारी देखील उपस्थित होते.

हेही वाचा – अमरावतीत खेळणी दुकानाला भीषण आग

भाजप सभांना घाबरली

महाविकास आघाडीच्या नेत्यांना कदाचित माझ्या सभांमुळे होणाऱ्या परिणामांची जाणीव नसेल मात्र भाजपला ती झाली आहे. त्यामुळेच माझ्या सभांना परवानगी नाकारली जात आहे. आजवर मी पंधरा हजाराहून अधिक सभा घेतल्या आहे. एकाही सभेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. मात्र आता हे कारण पुढे करत सभांना परवानगी दिली जात नाही. भाजप सत्तेत राहण्यासाठी काहीही करू शकते, असे श्याम मानव यांनी सांगितले.