डायलिसिस करणाऱ्या रुग्णांनाही सवलत
सिकलसेल, एचआयव्ही, हिमोफेलियाग्रस्त आणि मूत्रपिंडाच्या आजारात डायलिसिसचा उपचार घेणाऱ्या रुग्णांना एसटीमध्ये मोफत प्रवासाच्या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शिवशाही व वातानुकूलित बसमध्ये मात्र ही सवलत नाही. २०१५ मध्ये सिकलसेल रुग्णांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली होती. मात्र, त्यांची अंमलबजावणी झाली नव्हती.
राज्यातील २० जिल्ह्य़ांमध्ये सिकलसेलचे रुग्ण आढळतात. त्यांना उपचारासाठी डॉक्टरांकडे जाताना होणारा त्रास लक्षात घेता शासनाने २०१५ मध्ये रुग्णांसाठी मोफत एसटी प्रवास सवलतीची घोषणा केली होती. त्यासाठी निधीची अर्थसंकल्पात तरतूदही झाली होती. परंतु १२ नोव्हेंबर २०१८ पर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. या मुद्यावर सिकलसेल सोसायटीचे प्रमुख दिवंगत संपत रामटेके यांनी आंदोलन केले होते. न्यायालयातही त्यांनी दाद मागितली होती, परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. अखेर एसटी महामंडळाने आता ही सवलत लागू केली आहे.
‘‘सिकलसेल, एचआयव्ही, हिमोफेलियाग्रस्त व डायलिसिसचा उपचार घेणाऱ्या रुग्णांना साध्या आणि निमआराम बसमध्ये मोफत प्रवासाची सवलत लागू करण्यात आली आहे. सिकलसेलच्या रुग्णांना १५० किमीपर्यंत, एचआयव्ही रुग्णांना ५० किमीपर्यंत, डायलेसिस रुग्णांना १०० किमीपर्यंत, हिमोफलियाच्या रुग्णांना १५० किमीपर्यंत महिन्यातून दोन वेळा मोफत प्रवास करता येईल. या सेवेसाठी जिल्हा शल्यचिकित्सकासह शासकीय रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रमाणित केलेल्या आजाराच्या प्रमाणपत्रासह संबंधिताचे ओळखपत्र महत्त्वाचे आहे.’’
– अशोक वरठे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नागपूर.