लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भंडारा : भंडारा व गोंदिया जिल्ह्यात विस्तारलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या नागझिरा अभयारण्यात प्रदीर्घ कालावधीनंतर ५ वाघांचे एकत्र दर्शन झाल्याने पर्यटक व इको गाईडमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

शुक्रवारी सकाळी टी ४ वाघीण आणि तिचे ४ प्रौढ शावक दिसल्यानंतर पर्यटकांची संख्या नक्कीच वाढेल, अशी अपेक्षा आहे. आठवडाभराच्या सुट्टीनंतर शुक्रवारी पर्यटन सुरू झाले आणि सकाळी पिटेझरी ते नागझिरा संकुलाकडे जाणाऱ्या बुधा बुधीजवळ टी ४ वाघीण आणि तिची ४ पिल्ले आढळून आली. मुंडीपार आणि गोरेगाव येथील पर्यटकांनी याचा व्हिडिओ बनवला जो सोशल मीडियावर लगेच प्रसारित झाला.

आणखी वाचा-चोरट्यांचा आता आमदाराच्या घरावर डोळा, समीर कुणावारांकडून पोलीस तक्रार

बुकिंगवर परिणाम

वाघांच्या दर्शनाचा परिणाम सफारी बुकिंगवर दिसून आला आणि महा इको टुरिझमची ऑनलाइन बुकिंग एका दिवसात फुल्ल झाली. चोरखमारा आणि पिटेझरी प्रवेशद्वारातून नागझिरामध्ये दाखल होणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. इको टुरिझमचे मार्गदर्शक सुभाष उईके यांनी सांगितले की, बऱ्याच दिवसांनी वाघाचे दर्शन झाल्याने नागझिराप्रेमी पर्यटक व्याघ्र दर्शनासाठी आतूर झाले असून जिप्सी चालक व मार्गदर्शकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sighting of 5 tigers together waves of joy among tourists at nagzira sanctuary ksn 82 mrj