रानपिंगळ्याचे दर्शन तसे दुर्मिळच, मेळघाटात तो कधीतरी दिसतो. पक्षी सर्वेक्षणादरम्यान मेळघाटात तो दिसला आणि पक्षी अभ्यासक आनंदले. भारतातून रानपिंगळा लुप्त होत चालला आहे आणि मेळघाटातच त्याचे अस्तित्त्व आहे. या रानपिंगळ्यासोबतच पक्ष्यांच्या आठ नव्या प्रजाती देखील दिसून आल्या.
हेही वाचा >>>नागपूर:शिक्षक मतदारसंघ; दुपारी १२ पर्यंत ३४टक्के मतदान, सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यात
२६ ते २९ जानेवारीदरम्यान मेळघाट व्याघ्रप्रकल्पात आयोजित पक्षी सर्वेक्षणात २१३ पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झाली आहे. या पक्षी सर्वेक्षणात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, आंध्र या ११ राज्यांतील ६० स्पर्धक सहभागी झाले होते. अकोल्यातील अमोल सावंत यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. अनुभव कथन करतांना अनेक पक्षीमित्रांनी दुर्मीळ रानपिंगळा पाहण्याची ईच्छा या पक्षी सर्वेक्षणातून पुर्ण झाल्याचे सांगितले तर काही पक्षीमित्रांना दुर्मिळ पक्ष्यांसोबतच वाघ व अस्वलाचे पण दर्शन झाले. समिश डोंगळे यांनी रोसी मिनिव्हेट, लाँग-टेलेड मिनिव्हेट आणि काश्मीर फ्लायकॅचर या तीन नवीन प्रजातींची मेळघाटात पहिल्यांद नोंद केली.
हेही वाचा >>>अकोला: आजीला अल्पवयीन नातीच्या पाठीवर दिसल्या जखमा, विचारपूस करताच कुटुंबीय हादरले…
डॉ. संतोष सुरडकर, समिश धोंगळे, अंगुल खांडेकर, विष्णु लोखंडे, आखरे, चैतन्य दुधाळकर हे पक्षीमित्र सहभागी होते. समारोप कार्यक्रमात अकोट वन्यजीव विभागाच्या सहाय्यक उपवनसंरक्षक आर्या, वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश तापस, महाराष्ट्र पक्षीमित्रचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, किरण मोरे, मानद वन्यजीव रक्षक डॉ. सावन देशमुख, वाशिम जिल्हा समन्वयक मिलिंद सावदेकर उपस्थित होते. मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्रसंचालक जयोती बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनात पक्षी सर्वेक्षण करण्यात आले.