चंद्रपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आणि महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचं उत्तम उदाहरण असलेली वाघनखं ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार झाल्याचा अतिशय आनंद होत असून तमाम शिवप्रेमींसाठी, अवघ्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठीसुद्धा हा क्षण ऐतिहासिक आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.

शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे भारतात आणण्याचा संकल्प राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता, त्यानुसार वाघनखे आणण्याचा सामंजस्य करार मंगळवारी संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित राहून बोलत होते. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री यांचे व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, मंत्री महोदयांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाचे संचालक ट्रायस्टम हंट, भारताचे लंडनमधील उच्चायुक्त, त्यांचे सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Chief Minister Eknath Shinde testimony regarding Irshalwadi displaced houses
इरशाळवाडी विस्थापितांना हक्काची घरे मिळणार; निवडणूक आचारसहिंता लागण्यापूर्वी घरांचा ताबा देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
rohit pawar criticized devendra fadnavis
Rohit Pawar : “गृहमंत्री धृतराष्ट्राप्रमाणे सत्तेच्या मोहात आंधळे होऊन…”; पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून रोहित पवारांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र!
Deepak Kesarkar, Konkan, Konkan tourism,
निसर्ग आणि पर्यटन डोळ्यासमोर ठेवून कोकणात काम करायला आवडेल – मंत्री दीपक केसरकर
Who is BJP face for Delhi poll campaign Smriti Irani
Smriti Irani for Delhi CM: अमेठीत पराभव आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य दावेदार, भाजपा दिल्लीची सूत्रे स्मृती इराणींच्या हाती देणार?
Vijay Wadettiwar, Nagpur project, Gujarat,
नागपूरचा प्रकल्प गुजरातला जाणार हे वडेट्टीवार यांना कोणत्या सुत्रांनी सांगितले? उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सवाल
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
Jarange agitation, Mahavikas Aghadi,
जरांगे यांचे आंदोलन महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी – राजेंद्र राऊत

हेही वाचा – “..तर राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते”, आमदार मिटकरी म्हणतात, “हिंदू आक्रोश मोर्चे बंद…”

शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे प्रतीक असणारी ही वाघनखं शिवभूमीत आणत आहोत, हा दुग्धशर्करा योग असून शिवस्पर्श झालेली ही वाघनखं आपल्यासाठी अनमोल आहेत. असेही एकनाथ शिंदे म्हणाले. शिवराज्याभिषेकाच्या निमित्त सांस्कृतिक कार्य विभागानं हा संकल्प केला आणि तो पूर्णत्वासही नेला, त्याबद्दल मुख्यमंत्री यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आयुष्यातील महत्वाच्या आणि संस्मरणीय प्रसंगापैकी एक असा आजचा हा प्रसंग आहे. रयतेच्या रक्षणासाठी मृत्यूच्या दाढेत स्वतःला झोकून ज्या क्रूर अफझलखानाचा कोथळा शिवरायांनी बाहेर काढला ती वाघनखं माझ्या शिवबाच्या मातृभूमीत, महाराष्ट्रात शिवप्रेमींच्या दर्शनाला नेण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय हा अभिमानाचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे देव जरी नव्हते तरी आमच्यासाठी देवापेक्षा कमी नक्कीच नाहीत, ते आमचा स्वाभिमान आहेत, ती आमची प्रेरणा आहे, ती आमची ऊर्जा आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने केलेला संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात पूर्णत्वाकडे जातोय याचा अतिशय आनंद होतोय, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

हेही वाचा – शिंदे गटाच्या नाकावर टिच्चून राष्ट्रवादीचा पालकमंत्री! वळसे पाटील बुलढाण्याचे ‘पालक’

सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर मुनगंटीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र शासन आणि लंडनच्या व्हिक्टोरिया अँण्ड अल्बर्ट म्यूझियम यांच्या दरम्यान जो MOU झाला, त्यानुसार ही वाघनखं नोव्हेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीकरिता भारतात राहतील. ही वाघनखं महाराष्ट्रातील विविध संग्रहालयात शिवप्रेमी, इतिहासप्रेमी नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येतील. यात सातारा, नागपूर, कोल्हापूर येथील राज्य पुरातत्व विभागाच्या संग्रहालयांसह मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा समावेश राहणार आहे. सुधीर मुनगंटीवार करारासाठी संग्रहालयात जाण्यापूर्वी त्यांचे लंडन येथील मराठी बांधवांनी मराठमोळ्या पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत केले, त्यानंतर संग्रहालयातील इतर सर्व वस्तू बघत असताना शिवकालीन तसेच भारतातील इतर वस्तूंची त्यांनी कुतूहलाने माहिती जाणून घेतली. त्यानंतर स्थानिक महाराष्ट्र मंडळातर्फे मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला.