महेश बोकडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : काँग्रेसप्रणीत ‘इंटक’ या कामगार संघटनेतही उभी फूट पडल्याची चिन्हे आहेत. नुकतीच एसटी महामंडळाकडे इंटकच्या दोन वेगवेगळय़ा गटांनी पदाधिकाऱ्यांची वेगवेगळी यादी मान्यतेसाठी सादर केली. त्यानंतर महामंडळाने ‘इंटक’चा अंतर्गत वाद बघता अधिकृत कार्यकारिणी कोणती याचा निवाडा होईस्तोवर संघटनेच्या कार्यकारिणीची मान्यता रोखल्याची माहिती आहे.

‘इंटक’च्या दोन्ही गटाने ‘एसटी’ महामंडळाकडे सादर केलेल्या वेगवेगळय़ा पदाधिकाऱ्यांच्या यादीपैकी एका गटाचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड आणि दुसऱ्या गटाचे अध्यक्ष डॉ. कैलाश कदम यांना दाखवले गेले आहे. दुसऱ्या गटाचे सरचिटणीस मुकेश तिगोटे आहे. दरम्यान, एसटीने विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी विविध कामगार संघटनेला बोलवायचे झाल्यास महामंडळाकडे नोंद असलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवावे लागते. परंतु, ‘इंटक’च्या दोन गटाने वेगवेगळय़ा पदाधिकाऱ्यांची यादी सादर केल्याने महामंडळापुढे पेच निर्माण झाला.

दरम्यान, महामंडळाचे महाव्यवस्थापक यांनी त्यावर राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना पत्र लिहले. त्यात इंटकच्या दोन वेगवेगळय़ा पदाधिकाऱ्यांच्या याद्या महामंडळाला प्राप्त झाल्याचे सांगत त्यापैकी कोणती अधिकृत हे ठरवण्याचे अधिकार व्यवस्थापनास नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, केंद्रीय कार्यकारिणीचा वाद असतानाच दोन्ही गटांकडून विभाग स्तरावरही वेगवेगळय़ा पदाधिकाऱ्यांच्या यादीचा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. या विषयावर माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

इंटकमध्ये कुणाच्याही डोक्यावर कायमचा राजमुकुट नसतो. संघटनेतील पदाधिकारी निवडीची पद्धत आहे. जयप्रकाश छाजेडसाहेबांच्या अध्यक्षपदाची मुदत जानेवारी २०२२ मध्ये संपली. त्यानंतर बैठक, सभा घेऊन डॉ. कैलाश कदम यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर एसटी महामंडळाला पदाधिकाऱ्यांची यादी दिली असून तीच खरी आहे.

– मुकेश तिगोटे, इंटक नेते